भारताची आर्थिक क्षेत्रात होत असलेली अभिमानास्पद घोडदौड !

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

१. भारताची अर्थव्यवस्था ४ ट्रिलियन (एकावर १२ शून्य) डॉलर पार !

भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिक स्तरावर जबरदस्त प्रदर्शन होत आहे. भारताची अर्थव्यवस्था ४ ट्रिलियन (एकावर १२ शून्य) डॉलर पार झाली आहे. आता ती ४.३ ट्रिलियन डॉलर झाली आहे. गेल्या १० वर्षांत भारताने ‘जीडीपी’ (सकल राष्ट्रीय उत्पादन) दुप्पट केला आहे. वर्ष २०१५ मध्ये २.१ ट्रिलियन डॉलर, तर वर्ष २०२५ मध्ये ४.३ ट्रिलियन डॉलर इतकी प्रगती केली आहे. जगात कोणत्याही देशाचा ‘जीडीपी’ एवढ्या वेगाने गेल्या १० वर्षांत वाढला नाही.

२. औषधनिर्मिती क्षेत्रात ‘आत्मनिर्भर’ होत असलेला भारत !

कोविड महामारीच्या काळात भारत मास्क, ‘व्हेंटिलेटर’, ऑक्सिजन सिलिंडर आणि औषधे यांसाठी चीनवर अवलंबून होता; पण आज तोच भारत जागतिक औषधनिर्मितीच्या क्षेत्रात नेता बनला आहे ! सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांना स्वस्तात औषधे भारताकडून पुरवली जातात. वर्ष २०२३-२४ मध्ये भारताने तब्बल १.१५ लाख कोटी रुपयांची औषधे निर्यात केली !

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक, पुणे. (२३.३.२०२५)