पाल्यांना सुसंस्कारित बनवून त्यांना चांगल्या सवयी लावणे ही काळाची आवश्यकता ! – सौ. कल्पना थोरात, सनातन संस्था

‘ऑनलाईन’ विशेष बालसंस्कार वर्गास पाल्य आणि पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘माणूस’ कुणाला म्हणता येईल ?

‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वैराचार हे एक वेळ प्राण्यांचे वैशिष्ट्य असू शकते, माणसाचे नव्हे. ‘धर्मबंधनात रहाणे, धर्मशास्त्रांचे अनुकरण करणे’, असे करणार्‍यांनाच ‘माणूस’ म्हणता येते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

नीतीशिक्षणाची अत्यंत आवश्यकता !

‘अपराध करणार्‍यांना उग्र शिक्षा देणे, हे एक दुष्ट वृत्तींना आळा घालण्याचे तात्कालिक साधन झाले. तरी ती प्रवृत्तीच घालवून टाकण्याकरता त्याच्या अंत:करणाचे परिवर्तन करणारे ‘नीतीशिक्षण’ त्यांना देणे आवश्यक आहे.’

फाल्गुन मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

‘१४.३.२०२१ या दिवसापासून फाल्गुन मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

गोव्यात युवती घर सोडून ‘ऑनलाईन’ प्रियकरासमवेत जाण्याचे वाढते प्रकार !

एकत्र कुटुंबपद्धत नसल्याचा, मुलांना सुसंस्कारित करण्याकडे लक्ष न देता मुलांचे लाड करतांना त्यांना ‘स्मार्ट फोन’ दिल्याचा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वातंत्र्यानंतर समाजाला धर्मशिक्षण न दिल्याचा हा परिणाम आहे !

महिलांनी धर्माचरण करणे आणि स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – राजन केसरी, हिंदु जनजागृती समिती, वाराणसी

भारतीय महिलांकडून मोठ्या प्रमाणात पाश्‍चात्य संस्कृतीचे अंधानुकरण होत असल्यामुळे त्यांच्यावरील अत्याचारांमध्ये वाढ होत आहे. त्यासाठी महिलांंनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करणे आणि स्वरक्षणार्थ प्रशिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे.

गोवर्‍यांवर गायीच्या तुपाद्वारे हवन केल्यावर १२ घंटे घर संक्रमणमुक्त होते ! – मध्यप्रदेशच्या संस्कृती आणि अध्यात्म मंत्री उषा ठाकूर

सूर्योदय आणि सूर्यास्त यांवेळी गोवर्‍यांवर अक्षता मिसळलेल्या गायीच्या तुपाद्वारे २ वेळा आहुत्या दिल्यावर घर संक्रमणमुक्त (सॅनिटाईज) होते, असे प्रतिपादन मध्यप्रदेशच्या संस्कृती आणि अध्यात्म मंत्री उषा ठाकूर यांनी येथे केले.

महाशिवरात्र

एक निर्दयी आणि महापापी व्याध होता. एके दिवशी तो मृगयेसाठी निघाला असतांना वाटेत त्याला शिवाचे देऊळ दिसले. तो महाशिवरात्रीचा दिवस असल्याने त्या ठिकाणी भक्त पूजा, भजन, कीर्तन करत असलेले त्याने पाहिले.

शिवोपासनेची वैशिष्ट्ये आणि शास्त्र

शिवालयात असणारा नंदी हे शिवाचे वाहन आहे. शिवपिंडीचे दर्शन घेण्याआधी नंदीचे दर्शन घ्यावे. नंदीचे दर्शन घेतल्याने सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होते. यामुळे नंतर पिंडीचे दर्शन घेतांना, भक्ताला शिवाकडून येणार्‍या शक्तीशाली लहरी पेलण्याची क्षमता प्राप्त होते.

हिंदूंनो, शिवाच्या उपासनेविषयी धर्मशिक्षण जाणून घ्या !

शिवाच्या उपासनेत अंतर्भूत असलेल्या विविध कृती करण्याच्या योग्य पद्धती आणि त्यांचे शास्त्र यांविषयी समाजाला धर्मशिक्षण देण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणे, ही शिवभक्तांसाठी काळानुसार समष्टी साधना आहे.