समान नागरी कायद्याचा पुनरुच्चार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत १४ एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठीचे घोषणापत्र प्रकाशित केले आहे. या घोषणापत्रामध्ये समान नागरी कायदा करण्याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे.

‘आम आदमी पक्षा’च्या (‘आप’च्या) आडून देहली सरकारचा खजिना लुटण्याचे षड्यंत्र !

‘आप’कडून आंदोलन करून आणि गदारोळ माजवून ‘आपचे नेते पारदर्शी अन् प्रामाणिक आहेत’, असे सांगत आहेत; पण या पक्षाची पार्श्वभूमी काय आहे ? आणि त्यांची स्थिती, त्यांचे भ्रष्टाचार यांचा भांडाफोड करणारा लेख येथे देत आहोत.

संपूर्ण देशासाठी केंद्र सरकारने बनवले एकच पंचांग !

केंद्र सरकारकडून आता देशातील हिंदूंसाठी एकच पंचांग बनवण्यात आले आहे. यामुळे सण-उत्सव, उपवास, सुट्या साजरे करतांना येणार्‍या व्यावहारिक अडचणी दूर होतील, असे सांगण्यात आले आहे.

US Envoy Eric Garcetti : जगाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याची इच्छा असणार्‍यांनी भारतात यावे !

आज भारतीय अर्थव्यवस्था सशक्त झाली असून येणार्‍या दशकांमध्ये चीन आणि अमेरिका यांनाही ती शह देऊ शकते. अमेरिकी अर्थव्यवस्थाही खिळखिळी होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळेच ती भारताचे कौतुक करीत आहे !

हिंद महासागरात चीनने तैनात केल्या आहेत हेरगिरी करणार्‍या ३ नौका !

दक्षिण चीन समुद्रात तेथील देशांवर सागरी दबाव आणल्यानंतर चीनने आता हिंदी महासागर क्षेत्रात किमान ३ चिनी सर्वेक्षण आणि पाळत ठेवणार्‍या नौका तैनात केल्या आहेत. चीनला वर्ष २०२५ पर्यंत हिंदी महासागरात गस्त घालायची आहे.

US WarShip Repairing In India : भारताच्या ‘कोचिन शिपयार्ड’वर अमेरिकेच्या युद्धनौकांची होणार दुरुस्ती !

या ताज्या करारानंतर आता भारताच्या पूर्व आणि पश्‍चिम दोन्ही किनारपट्ट्यांवर अमेरिकी युद्धनौकांची सहज दुरुस्ती करता येणार आहे. अमेरिकेने या शिपयार्डची चौकशी करून सर्वेक्षण केले आणि त्यानंतर आता या कराराला मान्यता दिली आहे.

न्यायाधिशांनी अनेक मास निकाल न देता खटला राखून ठेवणे, हा चिंतेचा विषय ! – सरन्यायाधीश चंद्रचूड

न्यायाधीश १० महिन्यांहून अधिक काळ निकाल न देता खटला राखून ठेवतात. हा चिंतेचा विषय आहे, असे विधान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले.

India Heat Wave : देशात उष्णतेच्या लाटेचा धोका वाढला !

देशातील अनेक भागांत तापमान ४० ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. अशा स्थितीत उष्णतेच्या लाटेचा धोका वाढला आहे.

Nature’s Havoc Hotspots : देशातील ८ राज्यांत उष्णतेची लाट !

देशातील ९ प्रमुख शहरांमध्ये गेल्या १० वर्षांत झाडी आणि जलस्रोत अल्प झाले. जयपूर, कर्णावती, नागपूर, पुणे आणि चेन्नई या शहरांचा ८० टक्के भाग ‘उष्णता केंद्रे’ बनली आहेत.