७० वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देहली येथे होण्याची शक्यता !

देहलीसमवेतच इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), औंध (जिल्हा सातारा), औदुंबर (जिल्हा सांगली) मुंबई आणि धुळे येथूनही निमंत्रणे आली आहेत

SC Permitted Abortion To Minor : सर्वोच्च न्यायालयाकडून १४ वर्षीय बलात्कार पीडितेला गर्भपात करण्याची अनुमती !

गर्भपात झाल्यास मुलीला धोका उद्भवू शकतो; परंतु मूल जन्माला घालणे तिच्यासाठी अधिक धोकादायक आहे. हे १ दुर्मीळ प्रकरण असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

भारत पाक आणि चीन सीमेवर ३ सहस्र क्षेपणास्त्रे तैनात करणार !

भारताने चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर ३ सहस्र क्षेपणास्त्रे तैनात करण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे ही क्षेपणास्त्रे खांद्यावरून मारा करणार्‍या क्षेपणास्त्र लाँचरमधून डागता येणार आहे.

लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सरासरी ६० टक्के मतदान

देशातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला २१ राज्यांतील १०२ जागांवर मतदान घेण्यात आले. यात सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. बंगालमध्ये सर्वाधिक ७७ टक्के, तर बिहारमध्ये केवळ ४६ टक्के मतदान झाले.

निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य राखा ! – सर्वोच्च न्यायालय

निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य राखा. जे अपेक्षित आहे, ते होत नाही, अशी कुणालाच भीती वाटू नये, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे.

Supreme Court Mob Lynching : जमावाकडून होणार्‍या हत्यांना धर्माशी जोडू नका ! – सर्वोच्च न्यायालय

कन्हैयालाल हत्या प्रकरणाचा याचिकेत उल्लेख नसल्याने न्यायालयाने मुसलमान अधिवक्त्याला सुनावले !

एका आठवड्यात जनतेची जाहीर क्षमा मागा ! – सर्वोच्च न्यायालय

सध्या सुळसुळाट असलेल्या कथित ‘हेल्थ ड्रिंक्स’विषयी भारतीय वैद्यकीय संघटनेने कधी आवाज उठवला आहे का ?

निवडणूक आयोगाने जानेवारी मासापासून देशभरातून जप्त केले १२ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे

जप्त करण्यात आलेले पैसे इतके असतील, तर जप्त न केलेले पैसे  किती असतील ?, याची कल्पनाच करता येत नाही ! यातून भारतातील निवडणूक कशा पद्धतीने लढवली जाते ?, हे स्पष्ट होते !

यावर्षी देशात सामान्यपेक्षा चांगला पाऊस पडणार ! – हवामान विभागाचा अंदाज

यावर्षी देशात पावसाळा सामान्यपेक्षा चांगला रहाणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. सरासरीपेक्षा १०४ ते ११० टक्के पाऊस चांगला मानला जातो.

केंद्र सरकारकडून ‘ई कॉमर्स’ आस्थापनांना ‘बोर्नव्हिटा’ला हेल्थ ड्रिंक’ प्रकारातून काढण्याचा आदेश

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने देशातील सर्व ‘ई कॉमर्स’ आस्थापनांना ‘हेल्थड्रींक’ या विभागातून ‘बोर्नव्हिटा’ हा पदार्थ काढून टाकण्याचा आदेश दिला.