(म्हणे) ‘भारतात काँग्रेस पुन्हा सत्तेत आली, तर कलम ३७० वर पुनर्विचार करू !’

काँग्रेसला हिंदूंनी सत्ताच्युत का केले, याचे कोणतेही चिंतन काँग्रेसने केले नसल्यानेच तिचे नेते अशा प्रकारचे आश्‍वासन देऊन आत्मघात करत आहेत, हे लक्षात येते !

चिनी अ‍ॅप्सद्वारे २४ दिवसांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणार्‍या टोळीला अटक

भारत सरकारने आता चीनच्या प्रत्येक अ‍ॅपवर देशात बंदी घातली पाहिजे, हेच यावरून लक्षात येते !

मद्याचा पेला हातात घेतलेले भगवान शिवाचे ‘स्टिकर’ प्रसारित करणार्‍या इन्स्टाग्रामच्या विरोधात गुन्हा नोंद

मनीष सिंह यांनी तक्रारीत म्हटले आहे की, इन्स्टाग्रामने जाणीवपूर्वक हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी अशा प्रकारचे चित्र प्रसारित केले आहे.

२१ जूनपासून केंद्र सरकार देशातील १८ वर्षांवरील सर्वांचे विनामूल्य लसीकरण करणार ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

खासगी रुग्णालयांतही लस मिळणार आहे. तेथे केवळ लसीच्या मूल्यापेक्षा केवळ दीडशे रुपये अधिक रक्कम घेऊन ही उपलब्ध असणार आहे, असेही मोदी यांनी घोषित केले.

निवृत्तीच्या ४ वर्षांनंतर दोघा ब्रिगेडिअर्सना सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर बढती !

अशी घटना सैन्याला लज्जास्पद आहे ! याला उत्तरदायी असणार्‍या सर्व अधिकार्‍यांना शिक्षा झाली पाहिजे !

देहलीतील जी.बी. पंत रुग्णालयात परिचारिकांना मल्ल्याळम् भाषेत बोलण्यावर बंदी घालणारा आदेश रहित

देहलीतील विविध रुग्णालयांतील परिचारिकांनी याला संघटितपणे विरोध केल्याने हा आदेश अखेर मागे घ्यावा लागला.

देहली न्यायालयाची आय.एम्.ए.चे अध्यक्ष जॉनरोज ऑस्टिन जयलाल यांना तंबी !

जे न्यायालयाने सांगितले, ते आय.एम्.ए.च्या एकाही सदस्याने त्यांच्या अध्यक्षांना का सांगितले नाही ? कि त्यांना डॉ. जयलाल यांचे विधान मान्य होते ?

कन्नड भाषेविषयी अपशब्द वापरणार्‍या गूगलकडून क्षमायाचना !

गूगल ऑनलाइन ‘सर्च इंजिन’ने कन्नड भाषेला ‘भारतातील सर्वांत घाणेरडी भाषा’ असे म्हटले होते. कर्नाटक सरकारकडून विरोध झाल्यानंतर गूगलने भारतियांची क्षमा मागितली आहे.

मुसलमानेतरांना भारताचे नागरिकत्व देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला मुस्लिम लीगचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान

भारतात घुसलेले कोट्यवधी बांगलादेशी मुसलमान आणि म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमान यांना देशातून लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी मुस्लिम लीग कधी मागणी करत नाही किंवा न्यायालयात याचिका प्रविष्ट करत नाही, हे लक्षात घ्या !

देहलीत तिसर्‍या लाटेत प्रतिदिन ४५ सहस्र जण बाधित होतील ! – आयआयटी देहली

या काळात शहरातील रुग्णालयांना प्रतिदिन ९४४ मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता भासेल, असेही आयआयटी देहलीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.