भारतीय सैन्याकडून सूचना

नवी देहली – युद्धात मृत्यूमुखी पडणार्या सैनिकांसाठी ‘शहीद’ किंवा ‘हुतात्मा’ शब्दांचा वापर करणे चुकीचे आहे. सैन्याच्या काही अधिकार्यांकडून, तसेच प्रसारमाध्यमांकडून सैनिकांसाठी ‘शहीद’ शब्दाचा वापर केला जातो. ज्यांनी देशासाठी बलीदान दिले आहे, ज्या व्यक्तीने धर्मिक किंवा राजकीय आस्था, विचारांसाठी प्राण गमावले आहेत, अशा व्यक्तींसाठी ‘शहीद’ किंवा ‘हुतात्मा’ हा शब्द वापरला जातो. त्यामुळे भारतीय सैनिकांसाठी ‘शहीद’ शब्दाचा वापर करणे चुकीचे आहे, असे भारतीय सैन्याने म्हटले आहे. भारतीय सैन्याच्या मुख्यालयाने त्याच्या सर्व कमांडला पत्र लिहून याविषयीची सूचना दिली आहे.
The Army headquarters has issued a letter to all its Commands on the incorrect use of the term “#martyr” for soldiers fallen in the line of duty which it said “may not be appropriate”, reports @dperi84 https://t.co/GIw6vTIWvw
— The Hindu (@the_hindu) February 27, 2022
भारतीय सैन्याच्या मुख्यालयाकडून वीर सैनिकांसाठी पुढील शब्द वापरण्याची सूचना
१. किल्ड इन अॅक्शन (कारवाईत मारले गेले)
२. लेड डाउन देअर लाइफ (प्राणांचे बलीदान केले)
३. सुप्रिम सेक्रिफाइस फॉर नेशन (देशासाठी दिले सर्वोच्च बलीदान)
४. फॉलन हीरोज (वीरगतीला प्राप्त)
५. इंडियन आर्मी ब्रेव्स (भारतीय सेनेचे वीर)
६. फॉलन सोल्जर्स (युद्धात कामी आले)
९ संतांची धार्मिक समिती स्थापन : प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्याकडे अध्यक्षपद
वारकर्यांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्यांचा जाहीर निषेध, तर हिंदुत्वनिष्ठ संतांचा भव्य सन्मान करणार ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, अध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय