एकमेकांविषयी द्वेषभावना उत्पन्न करणारे विष मुलांच्या मनात कालवणे अयोग्य ! – सद्गुरु जग्गी वासुदेव

कर्नाटकात चालू असलेल्या हिजाब वादाचे प्रकरण

नवी देहली – समाजाच्या एकत्रीकरणासाठीच्या सूत्रांकडे पहाण्यापेक्षा दुर्दैवाने ‘त्याचे विभाजन कसे होईल’, याकडे लक्ष दिले जात आहे. मातीमध्ये सर्वांना एकत्र आणण्याचे सामर्थ्य आहे. आपली निर्मिती मातीपासून झाली असून आपला अंतही मातीच होणार आहे. लहान वयात मुक्तपणे वाढण्याचे वातावरण निर्माण व्हायला हवे.

 (सौजन्य : Sadhguru)

एकमेकांविषयी द्वेषभावना उत्पन्न करणारे विष मुलांच्या मनात कालवणे अयोग्य आहे. प्रत्येक नव्या पिढीवर आधीच्या पिढ्यांचे विचार आणि पूर्वग्रह थोपवले जाऊ नये, असे वक्तव्य ‘ईशा फाऊंडेशन’ या आध्यात्मिक संस्थेचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी कर्नाटकात चालू असलेल्या ‘हिजाब’ वादावर एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीमध्ये केले.