देहली विद्यापिठाच्या लक्ष्मीबाई महाविद्यालयात यज्ञशाळा उभारणीच्या कामाला वेग !

  • वातावरणशुद्धीसाठी केले जाणार यज्ञ !

  • महाविद्यालयात निर्माण केले गोकुळासारखे वातावरण !

  • देहलीतील वाढते वायु प्रदूषाण रोखण्यासाठी स्तुत्य उपक्रम !

देहली विद्यापिठाचे लक्ष्मीबाई महाविद्यालय

नवी देहली – राजधानी देहलीतील वाढत्या वायु प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर देहली विद्यापिठाच्या लक्ष्मीबाई महाविद्यालयात यज्ञशाळा उभारण्यात येणार आहे. या महाविद्यालयाच्या परिसरात गावासारखे वातावरण निर्माण करण्यात आले असून त्याला ‘गोकुळ’ असे नाव देण्यात आले आहे. या यज्ञशाळेच्या उभारणीच्या कामाला वेग आला आहे.

लक्ष्मीबाई महाविद्यालयात निर्माण करण्यात आलेली यज्ञशाळा

या अनोख्या उपक्रमाविषयी माहिती देतांना लक्ष्मीबाई महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रत्यूष वत्सला म्हणाल्या की,

लक्ष्मीबाई महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रत्यूष वत्सला

१. आमच्या महाविद्यालयातील ही यज्ञशाळा चैत्र मासात चालू होईल. वातावरणशुद्धीसाठी वेगवेगळ्या प्रसंगी येथे यज्ञ केले जाणार आहेत.

Lakshmibai College
University Of Delhi
Department of Environmental Sciences
(Click on image)

२. या महाविद्यालयाच्या परिसरात निर्माण करण्यात आलेल्या गोकुळात तलाव, झोपडी, झोका, मंदिर, नैसर्गिक बाग आदी सिद्ध करण्यात आले आहे. या परिसरात बदक आणि ससेही आहेत. या वातावरणामुळे महाविद्यातील विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यामध्ये गावाविषयी आपुलकी निर्माण होईल.