संरक्षण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पीय खर्चावर देखरेख करण्यासाठी समिती स्थापन करणार ! – राजनाथ सिंह

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

नवी देहली – संरक्षण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पीय खर्चावर देखरेख करण्यासाठी तिन्ही दलांच्या प्रतिनिधींसह एक समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथ दिली. या अर्थसंकल्पामध्ये आयात अल्प करणे आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून सशस्त्र दलांना अत्याधुनिक बनवणे, या सरकारच्या वचनबद्धतेवर भर देण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ‘मेक इन इंडिया’ वर भर देण्यात आला असून त्या अंतर्गत वर्ष २०२२-२०२३ या आर्थिक वर्षामध्ये न्यूनतम ५ प्रकल्पांना मान्यता देण्यात येणार आहे, असेही सिंह यांनी सांगितले.