नवी देहली – उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाचे सरकार असतांना वर्ष २०१३ मध्ये राज्यातील ७ जिल्ह्यांतील आतंकवादी आक्रमणाशी संबंधित १४ खटले मागे घेण्यात आले होते, असे समोर आले आहे. यांतील काही खटले मागे घेण्यास न्यायालयाने नकार दिला. या प्रकरणात पुढे या आरोपींना दोषी ठरवून त्यांना २० वर्षांपर्यंतची शिक्षा झाली. भाजपने यापूर्वी समाजवादी पक्षावर आतंकवादी आक्रमणातील आरोपींप्रती सहानुभूती दाखवल्याचा आरोप केला आहे.