‘निझामुद्दीन मरकज’ पूर्णपणे उघडू शकत नाही ! – देहली उच्च न्यायालय

‘शब-ए-बरात’ आणि रमझान या काळांत काही जणांना नमाजपठणाची अनुमती

नवी देहली – देहली उच्च न्यायालयाने येथील ‘निझामुद्दीन मरकज’ पूर्णपणे उघडण्यास विरोध केला आहे. न्यायालयाने म्हटले, ‘सध्या हे शक्य नाही. काही जण ‘शब-ए-बरात’ आणि रमझान या सणांच्या वेळी नमाजपठणासाठी तेथे जाऊ शकतात.’ ‘देहली वक्फ बोर्डा’ने मरकज पुन्हा उघडण्याची मागणी करणारी याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला. मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या काळात येथे तबलिगी जमातचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. येथे मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे ते रिकामे करून बंद करण्यात आले होते.