प्रसिद्ध भविष्यवेत्ते श्री संत बेतरा अशोका यांची भविष्यवाणी
देहली – येत्या १० वर्षांत ‘हिंदु राष्ट्र’ घोषित होईल आणि या हिंदु राष्ट्राचे पहिले पंतप्रधान योगी आदित्यनाथ असतील’, अशी भविष्यवाणी प्रसिद्ध भविष्यवेत्ते श्री संत बेतरा अशोका यांनी केली. ‘ते देशाच्या मौल्यवान रत्नांपैकी आहेत’, असेही ते म्हणाले.
(सौजन्य : Dharm Gyan)
श्री संत बेतरा अशोका यांची प्रत्येक भविष्यवाणी खरी ठरली आहे. वर्ष २०१७ मध्ये योगी आदित्यनाथ हेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री बनतील, असे कुणालाच वाटले नव्हते. तेव्हाही त्यांनी सांगितले होते की, ‘ए’ आद्याक्षरावरून नाव असलेला नेता उत्तरप्रदेशचा मुख्यमंत्री होईल आणि त्याप्रमाणे योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते.
पंतप्रधान मोदी वर्ष २०३० पर्यंत पदावर असतील !
योगी आदित्यनाथ हे वर्ष २०२४ मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधानपदाचे प्रमुख उमेदवार असतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर श्री संत बेतरा अशोका यांना प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देतांना श्री संत बेतरा अशोका म्हणाले, ‘‘मी वर्ष २०१४ मध्येच भविष्यवाणी केली होती की, पुढे १५ वर्षापर्यंत नरेंद्र मोदी हेच भारताचे पंतप्रधान असतील आणि वर्ष २०३० मध्ये ते स्वेच्छेने त्यांचे पद हस्तांतरित करतील.’’
(सौजन्य : NMF News)
श्री संत बेतरा अशोका पुढे म्हणाले की, योगी आदित्यनाथ हे युवा नेते असून राष्ट्रभक्त आहेत. त्यांच्यात राष्ट्रभक्ती ओतप्रोत भरली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या मागील कार्यकाळात त्यांच्यावर कोणताही डाग नाही. त्यांनी ज्याप्रकारे काम केले आहे, त्यावरून येणार्या काळात ते देशाची सूत्रे सांभाळतील, हे लक्षात येते. ते पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार आहेत आणि एक दिवस देशाचे पंतप्रधान बनतील, असे भविष्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे.