|
|
नवी देहली – ‘द कश्मीर फाइल्स’ या काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फोडणार्या चित्रपटाला जिथे समाजातील विविध स्तरांवरून भरघोस समर्थन प्राप्त होत आहे, तिथे धर्मनिरपेक्षतावादी आणि साम्यवादी विचारसरणीच्या हिंदुद्वेष्ट्या चमूकडून विरोधही केला जात आहे.
‘विकिपीडिया’ या जगातील प्रत्येक गोष्टीची माहिती देणार्या ‘ऑनलाइन एनसाइक्लोपिडिया’च्या (विश्वकोशाच्या) संकेतस्थळावर या चित्रपटाविषयी माहिती देणारे पानही प्रकाशित झाले आहे. त्यामध्ये काही संपादकांकडून चित्रपटासंदर्भातील वास्तविक माहिती देऊन अन् त्यास विश्वासार्ह संदर्भ जोडूनही काही साम्यवादी विचारसरणी जोपासणार्या संपादकांकडून छेडछाड केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
Wikipedia page of ‘The Kashmir Files’ vandalised, editor admits to bias: All you need to know https://t.co/X2OyxCyXkS
— OpIndia.com (@OpIndia_com) March 14, 2022
१. ‘ट्रँगाबेल्लम’ नावाच्या साम्यवादी विचारसरणीच्या ‘विकिपीडिया’च्या संपादकाने ‘द कश्मीर फाइल्स’च्या पानावरील सत्यान्वेषी माहितीचा पुष्कळ भाग काढून चित्रपटासंदर्भातील नकारात्मक प्रतिक्रिया पानामध्ये घातल्या. नकारात्मक भाग जोडत असतांना विकिपीडियाने ‘ब्लॅकलिस्ट’ (निषिद्ध) केलेल्या संकेतस्थळांचा संदर्भ जोडला.
Thread: How Wikipedia editors TrangaBellam, VanaMonde & Kautilya are narrating Hindu history on Wikipedia with anti-Hindu bias.
They are targeting articles of Hindu Kings, Temples, historical events and texts.
This will be a contributory thread.
Friends, please add your comments.— Soumyadipta (@Soumyadipta) March 2, 2022
२. ‘ट्रँगाबेल्लम’ यांनी ‘इंडिया टुडे’च्या संकेतस्थळावरील चित्रपटाच्या सकारात्मक समीक्षणाचा संदर्भ काढून ती सर्व माहिती पुसली आणि ‘फिल्म कंपॅनियन’ या ‘विकिपीडिया’च्या दृष्टीने निषिद्ध असलेल्या संकेतस्थळाचा संदर्भ देऊन चित्रपटाच्या विरोधात लिहिलेल्या समीक्षणाचा उल्लेख पानावर केला.
३. ज्या संपादकांनी सत्य माहिती जोडली होती, त्यांनी या कृतीचा निषेध केला. त्यावर ‘ट्रँगाबेल्लम’ नावाच्या संपादकाने उडवाउडवीची उत्तरे दिली.
Audrey Truschke makes her battle against Vikram Sampath personal? Sampath's Wikipedia page vandalised by Truschke supporters: Detailshttps://t.co/DkUSstEGz8
— OpIndia.com (@OpIndia_com) March 5, 2022
४. प्रखर हिंदुत्वनिष्ठ लेखक श्री. विक्रम संपथ यांची माहिती देणार्या ‘विकिपीडिया’वरील पानाशीही याच हिंदुद्वेष्ट्या संपादकाने छेडछाड केली होती.
‘विकिपीडिया’ कार्य कसे करते ?‘विकिपीडिया’ हे ऑनलाइन विश्वकोष असून ते जगभरातील स्वयंसेवकांकडून चालवले जाते. यामध्ये जवळपास प्रत्येक विषय, प्रतिष्ठित व्यक्ती, देश आदींवर माहिती देणारी लक्षावधी पाने आहेत. त्या-त्या विषयांवर माहिती लिहिण्यासाठी स्वयंसेवकांना त्यामध्ये ऑनलाइन खाते उघडावे लागते. स्वयंसेवक असलेल्या या संपादकांना अमुक विषयावर माहिती जोडतांना अधिकृत संकेतस्थळांचा संदर्भ जोडावा लागतो, अन्यथा त्या विषयावरील माहिती ग्राह्य धरली जात नाही. विविध स्वयंसेवक असलेले संपादक ही माहिती केव्हाही पालटू शकतात, परंतु ती माहिती योग्य आहे की नाही, याकडे लक्ष ठेवणारी व्यवस्थाही या संकेतस्थळाने कार्यान्वित केलेली आहे. असे असले, तरी या संकेतस्थळावर साम्यवादी विचारसरणीच्या स्वयंसेवकांचा भरणा असल्याने अन् त्यातील व्यवस्थाही हिंदुद्वेष्टी असल्याने हिंदूंना मारक असलेली माहिती अनेक वेळा या संकेतस्थळावर पहायला मिळते. काही मासांपूर्वी ‘हे संकेतस्थळ तटस्थ नसून साम्यवादी अन् उदारमतवादी विचारसरणी जोपासणार्यांच्या हातात गेलेले आहे’, असा आरोप करत संकेतस्थळाचे सहसंस्थापक लॅरी सँगर यांनी या आस्थापनाला सोडचिठ्ठी दिली होती. |