भाजपचे पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे पुण्यात कर्करोगाच्या आजारामुळे निधन !

पक्षनिष्ठा आणि समर्पणाचा लक्ष्मणजी वस्तूपाठ होते. बरे होतील असे वाटतांनाच त्यांचे असे जाणे चटका लावणारे आहे.

माजी पोप बेनेडिक्ट १६ वे यांचे निधन

माजी पोप बेनेडिक्ट १६ वे यांचे ३१ डिसेंबर या दिवशी येथे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. सध्याचे पोप फ्रन्सिस यांनी काही दिवसांपूर्वी माजी पोप बेनेडिक्ट यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते.

ब्राझिलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचे निधन

पेले यांनी जवळपास २ दशके त्यांच्या खेळाद्वारे चाहत्यांचे मनोरंजन केले. पेले यांच्या नेतृत्वाखाली ब्राझिलने वर्ष १९५८, वर्ष १९६२ आणि वर्ष १९७० मध्ये विश्‍वचषक जिंकले होते.

पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री हिराबा मोदी पंचतत्त्वात विलीन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईच्या निधनाविषयी ट्वीट करून सांगितले की, आईचेे जीवन म्हणजे एका तपस्वीची यात्रा होती. आई म्हणजे निष्काम कर्मयोगी आणि आदर्श मूल्यांनी जीवन जगण्याचे प्रतीक आहे.

आमदार मुक्ता टिळक यांना विधानसभेत श्रद्धांजली !

मुक्ता टिळक यांच्यासारख्या निष्ठावान, कर्तृत्ववान लोकप्रतिनिधींच्या निधनामुळे केवळ भाजपचीच नव्हे, तर समाजाचीही हानी झाली आहे.

गुरुवर्य ह.भ.प. नामदेव आप्पा शामगावकर यांचा देहत्याग !

महाराजांच्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त शामगाव, तालुका कराड येथे १३ ते २६ डिसेंबर या कालावधीत ‘अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.

निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी असलेल्या २ सैनिकांमध्ये वाद गोळीबारात २ सैनिकांचा मृत्यू

जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असतांना अशा प्रकारे किरकोळ कारणावरून सैनिकांचे अनमोल जीव जाणे गंभीर आहे ! यावर तात्काळ उपाययोजना काढली गेली पाहिजे !

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यात प्रदीर्घ आजाराने निधन

ज्या योद्धयांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न मोठ्या नेत्यांनी केला नाही. आपले लोक ब्रिटिशांविरुद्ध लढत आहेत, हे पाहूनही त्यांनी वाचवले नाही- विक्रम गोखले

सनातनचे संत पू. रमेश गडकरी यांना मातृशोक !

त्यांच्या पश्चात् २ मुले, २ सुना, १ मुलगी, जावई, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार गडकरी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांचे वडील आणि ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले विजय (नाना) वर्तक (वय ७७ वर्षे) यांचे निधन

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मामेभाऊ तथा सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांचे वडील विजय (नाना) वर्तक यांचे ९ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ७ वाजता नागोठणे येथील त्यांच्या रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.