बलिया (उत्तरप्रदेश) येथे ३ दिवसांत ६० जण मृत्यूमुखी !

तीव्र उन्हाळ्यामुळे मृत्यूंचे प्रमाण वाढल्याचा अंदाज !

रुग्णालय

बलिया (उत्तरप्रदेश) – येथे ३ दिवसांत ६० जणांचा मृत्यू झाला असून यामागील कारणे वेगवेगळी असल्याचे जिल्हा वैद्यकीय अधिकार्‍याचे म्हणणे आहे. सध्या राज्यात उष्णतेची तीव्रता पुष्कळ असल्यानेही मृत्यूंची संख्या वाढल्याचे म्हटले जात आहे. प्रतिदिन १२५ ते १३५ रुग्णांना रुग्णालयांमध्ये भरती केले जात आहे. १५ जून या एकाच दिवशी १५४ रुग्णांना भरती केल्यानंतर २३ रुग्णांचा मृत्यू झाला. १६ जूनला २०, तर १७ जूनला ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. रुग्ण मृत्यूमुखी पडण्यामागील कारण हे एखादा रोगही असू शकतो, असे प्रशासकीय अधिकार्‍यांनी सांगितले.