रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार आणि रामभक्त पू. सदानंद भस्मे महाराज यांचा देहत्याग !

येथील कीर्तनकार आणि रामभक्त सदानंद भस्मे महाराज यांनी २२ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी वयाच्या ८२ व्या वर्षी शिवानंद कुटीर येथे देहत्याग केला.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे हृदयविकाराच्या आजाराने पुणे येथे निधन !

माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे पुणे येथे निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

इस्रायलने सीरियाच्या राजधानीवर केलेल्या आक्रमणात ५ जण ठार

दीड मासापूर्वी इस्रायलने दमास्कसच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केले होते. त्यात २ सैनिकांसह ४ नागरिक ठार झाले होते.

संभाजीनगर येथे भरधाव कार थेट दुकानात घुसल्याने दुकानदाराचा मृत्यू !

नागपूर-मुंबई महामार्गावर असलेल्या एका दुकानात भरधाव चारचाकी घुसल्याने दुकानदार रोहित पवार यांचा मृत्यू झाला आहे.

तुर्कीये आणि सीरिया येथे भूकंपबळींची संख्या २८ सहस्रांहून अधिक !

तुर्कस्तानच्या भूकंपात विजय कुमार गौड नावाच्या भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. त्यांची ओळख पटवणे अत्यंत कठीण होते; परंतु त्यांच्या हातावरील ‘ॐ’ च्या ‘टॅटू’मुळे त्यांची ओळख पटली.

गोवा मुक्तीलढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली निवर्तले !

नागेश करमली यांचा कोकणी भाषा मंडळाच्या स्थापनेत महत्त्वाचा वाटा होता. गझल हा प्रकार त्यांनी कोकणीत रूजवला. त्यांनी मराठी वर्तमानपत्रातही स्तंभलेखन केले आहे.

कारगिल युद्धास उत्तरदायी असलेले पाकचे माजी राष्‍ट्रपती परवेझ मुशर्रफ यांचे निधन

ते ७९ वर्षांचे होते. मुशर्रफ ८ मासांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते.

दैनिक ‘केसरी’च्‍या पिंपरी कार्यालयाचे प्रमुख ज्‍येष्‍ठ पत्रकार विजय भोसले यांचे हृदयविकाराने निधन !

पत्रकारितेतील अनुभवी व्‍यक्‍तिमत्त्व म्‍हणून ज्‍येष्‍ठ पत्रकार विजय भोसले यांच्याकडे पाहिले जायचे. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्‍यांच्‍या निधनाने पत्रकारिता क्षेत्राला मोठा धक्‍का बसला आहे.

जनता दल (संयुक्त) पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांचे निधन

त्यांच्या पार्थिवावर १४ जानेवारी या दिवशी मध्यप्रदेशच्या बबई तालुक्यातील अंकमाऊ गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कराड येथील श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे ज्‍येष्‍ठ धारकरी रवींद्र केशव डोंबे यांचे निधन !

चौंडेश्‍वरीनगरमधील श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे ज्‍येष्‍ठ धारकरी रवींद्र केशव डोंबे (वय ५१ वर्षे) यांचे बुधवार, ४ जानेवारी या रात्री हृदयविकाराच्‍या तीव्र झटक्‍यामुळे निधन झाले. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.