मुंबईचे माजी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांचे निधन

माजी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर कालवश

मुंबई – येथील माजी महापौर आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ नेते विश्‍वनाथ महाडेश्‍वर (वय ६३ वर्षे) यांचे ८ मे या दिवशी हृदयविकाराचा तीव्र धक्क्याने निधन झाले. ९ मे या दिवशी दुपारी २ वाजता त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी राजे संभाजी विद्यालयात ठेवण्यात आले होते. दुपारी ४ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्यांच्या अंत्ययात्रेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह इतरही शिवसैनिक उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून महाडेश्‍वर यांची प्रकृती ठीक नव्हती. ते मूळचे सिंधुदुर्ग येथील होते.