केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना उपचारासाठी गोव्याबाहेर नेण्याची आवश्यकता नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक सध्या बोलू शकत आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना पुढील २४ घंटे निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्यांचा ‘व्हेंटिलेटर सपोर्ट’ही काढण्यात आला आहे आणि त्यांना ‘हाय फ्लो नेसल ऑक्सीजन’वर ठेवण्यात आले आहे.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या पुणे येथील भक्त डॉ. (सौ.) पूजा जोशी यांचे दीर्घ आजाराने निधन

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे येथील भक्त कै. दत्तात्रय जोशी यांच्या सून डॉ. (सौ.) पूजा प्रशांत जोशी (वय ५६ वर्षे) यांचे ८ जानेवारी २०२१ या दिवशी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले.

सांगली येथील निवृत्त उपशिक्षणाधिकारी वसंत चौगुले यांचे निधन

सांगली येथील निवृत्त उपशिक्षणाधिकारी वसंत चौगुले यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच पालिकेत प्रशासन अधिकारी म्हणून काम केले होते. ते साप्ताहिक सनातन प्रभातचे नियमित वाचक, तसेच सनातन संस्थेचे अर्पणदातेही होते.

अकोला येथील मृदंगाचार्य श्रीहरी महाराज शेळके यांचे निधन

महाराष्ट्रभूषण समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृती महाराज देशमुख यांचे लाडके मृदंगाचार्य आणि ह.भ.प. गणेश महाराज शेटे यांचे स्नेही श्रीहरी महाराज शेळके ठाणगावकर (वय ३० वर्षे) यांचे ९ जानेवारी या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.

कोल्हापुरातील प्रसिद्ध फौजदारी वकील दिलीप मुंदरगी यांचे निधन

कोल्हापुरातील प्रसिद्ध फौजदारी वकील दिलीप मुंदरगी (वय ६० वर्षे) यांचे ७ जानेवारी या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते.

निधन वार्ता  

भोसरी येथील सनातनचे साधक श्री. योगेश यशवंतराव सुभेदार यांची आई कै.पुष्पा यशवंतराव सुभेदार (वय ५७ वर्षे) यांचे ३ जानेवारीला मध्यरात्री १.३० वाजता आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती,२ मुले,१ सुन,१ मुलगी,१ नात असा परिवार आहे

निधन वार्ता

बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील सनातनच्या साधिका सौ. अलका मुकेश सुलाखे यांच्या सासूबाई श्रीमती प्रभावती सुलाखे (वय ८४ वर्षे) यांचे ३० डिसेंबरच्या रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.

शिरोडा, फोंडा येथील सुप्रसिद्ध संवादिनी वादक विष्णुबुवा फडके यांचे निधन !

सुप्रसिद्ध संवादिनी (हार्मोनियम) वादक विष्णुबुवा फडके (वय ९८ वर्षे) यांना ३० डिसेंबर या दिवशी सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी देवाज्ञा झाली. ते सनातनच्या साधिका सौ. सुविधा फडके यांचे सासरे होत.