महाराष्ट्रात आढळले १ सहस्र ६६४ बनावट सीमकार्ड !
बनावट सीमकार्डद्वारे होणार्या सायबर गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बनावट सीमकार्ड वापरून आर्थिक लूट केल्याप्रकरणी महाराष्ट्रात १८ गुन्हे नोंदवण्यात आले असून यामध्ये तब्बल १ सहस्र ६६४ बोगस सीमकार्ड वितरीत करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.