६ कोटी रुपयांहून अधिक दंड जमा

पुणे – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण, भोसरी, तळेगाव, हिंजवडी, तळवडे ही मोठी औद्योगिक क्षेत्रे येतात. पिंपरी-चिंचवड शहरातून प्रतिदिन लाखो वाहनांची वर्दळ चालू असते. यामध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शाखेने मे महिन्यात विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमभंग करणार्या वाहनचालकांवर कारवाई केली. या कारवाईतून ६ कोटी ७६ लाख ३० सहस्र ९०० रुपये दंड जमा करण्यात आला आहे. ‘नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून दंडात्मक कारवाई टाळावी’, असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी केले आहे.
५ सहस्र ४७४ जणांवर गाडीच्या क्रमांकात (‘नंबर प्लेट’मध्ये) फेरफार करणे, २८४ जणांवर धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे, ८ सहस्र ४८३ वाहनचालकांवर ‘सिग्नल’ तोडणे, १ सहस्र ९९३ चालकांवर वाहन चालवतांना भ्रमणभाषवर बोलणे, ६ सहस्र ५३९ जणांवर दुचाकीवरून ३ जणांनी प्रवास करणे, चुकीच्या बाजूने प्रवास करणे, १९ सहस्र ३४० वाहनांवर ‘नो पार्किंग’मध्ये वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, ११ सहस्र ५८० वाहने ‘टोईंग’ करण्यात आली. मद्यप्राशन करून वाहन चालवणार्या ४०२ वाहनचालकांवर गुन्हा नोंद करण्यात आला. या व्यतिरिक्त १ सहस्र ३२ जणांवर ‘मॉडिफाइड सायलेंसर’ बसवणे, ३ सहस्र ९० जणांवर वाहनाला काळी काच लावणे, ४२९ जणांवर शिरस्त्राण (हेल्मेट) नसणे, ८ सहस्र १४२ जड वाहनांवर, ८७० विनापरवाना वाहनचालक, ३ सहस्र ४९० बस आणि ३ सहस्र १०२ रिक्शाचालकांवरही कारवाई करण्यात आली. गंभीर नियमभंग करणार्या १६६ वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यात आले.
एस्.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्र्यांकडून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ !
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
कंत्राटदाराला ५ लाख रुपये, तर सल्लागार संस्थेला २ लाख रुपयांचा दंड !
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री