कचरा टाकतांनाचा व्हिडिओ प्रसारित झाल्याने मानसिक तणावातून स्वतःवरच गोळी झाडली !

म्हापसा, ५ जून (वार्ता.) – सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांनाचा गवसावाडा, म्हापसा येथील सॅम्युअल गार्विक दी ब्रागांका (वय २३ वर्षे) या युवकाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला होता. या प्रकरणाची म्हापसा पोलिसांनी नोंद घेऊन त्या युवकावर गुन्हा नोंद केला. यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड मानसिक तणावामुळे सॅम्युअल याने स्वतःवर पिस्तुलाची गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (या युवकाकडे पिस्तुल कुठून आले ? याचीही चौकशी व्हायला हवी ! पिस्तुल असे सहजपणे उपलब्ध होते का ? – संपादक) यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार ही घटना ४ जूनच्या मध्यरात्रीनंतर घडली. सॅम्युअल याने स्नानगृहात स्वतःवर गोळी झाडली. रात्री अचानकपणे गोळीबाराचा मोठा आवाज झाल्याने सॅम्युअल याच्या घरातील सदस्यांनी त्याच्या शयनकक्षाकडे धाव घेतली. त्या वेळी तो स्नानगृहामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याच्या कुटुंबियांनी त्याला तातडीने म्हापसा जिल्हा रुग्णालयात भरती केले; परंतु उपचारापूर्वी आधुनिक वैद्यांनी (डॉक्टरांनी) त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. शवचिकित्सेसाठी मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
३ जून या दिवशी सॅम्युअल रस्त्याच्या कडेला कचरा टाकत असल्याचा व्हिडिओ एका नागरिकाने केला होता. ४ जून या दिवशी सकाळी हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. या व्हिडिओची नोंद घेऊन पोलिसांनी सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण केल्याच्या आरोपाखाली सॅम्युअल याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २७१ आणि गोवा नॉन- बायोडिग्रेडेबल गार्बेज कंट्रोल कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. त्याचप्रमाणे त्याला ४ जून या दिवशी पोलीस ठाण्यात बोलावून कायदेशीर नोटीस देण्यात आली होती. या सर्व गोष्टींमुळे आणि समाजात मानहानी होण्याच्या भीतीने तीव्र निराशेपोटी सॅम्युअल याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !