बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !


पुणे –
पुणे-मुंबई महामार्गावरील बोपोडी येथील हजरत शमसुद्दीन दर्गा महापालिकेने पाडला. स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता आणि कायदेशीर गोष्टींची पूर्तता न करता ही कारवाई झाली. उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी अधिकार्‍यांनी कारवाई करणार नसल्याचे सांगून पहाटे गुपचूप कारवाई केल्याचा आरोप केला आहे. याविषयी मी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित करणार आहे, असे वाडेकर यांनी सांगितले. (दर्गा पाडल्यावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित करण्याची भाषा करणार्‍यांची ढोंगी आणि लांगूलचालनाची मानसिकता स्पष्ट होते ! – संपादक)