रामनाथी – देशात खोटी कथानके (नॅरेटिव्ह्स) रचून ती सामाजिक माध्यमातून प्रसारित करण्याचे कार्य युद्धपातळीवर चालू आहे. या माध्यमातून वैचारिक आक्रमण चालू आहे. हा ‘सायबर जिहाद’ आहे. हे ‘कथानक युद्ध’ निपटण्यासाठी योग्य कथा सिद्ध करून त्याचा प्रसार करावा लागेल. हे बौद्धिक युद्ध लढण्यासाठी आचार्य चाणक्य यांची बुद्धीमत्ता आणि छत्रपती शिवाज महाराज यांचे शौर्य अंगी असणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्र धर्म संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. संतोष केंचम्बा यांनी वैश्विक अखिल भारतीय हिंदु महोत्सवात बोलतांना व्यक्त केले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या दुसर्या दिवशीच्या तृतीय सत्रात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भारतीय संस्कृतीचा प्रसार योग्य तर्हेने झाला पाहिजे. हिंदु संस्कृतीचा प्रसार करणे हे आपण सर्वांचे दायित्व आहे. भारतातील गुरु-शिष्य परंपरेच्या अंतर्गत योग्य कथांच्या माध्यमातून हिंदु संस्कृतीचा प्रसार होत असे. ही परंपरा पुनर्जिवित करून कथांच्या माध्यमातून हिंदु संस्कृतीचा प्रसार करणे आवश्यक आहे.