ही टोळी अश्लील चलचित्र सामाजिक माध्यमात फिरवत होती !
पणजी, २८ जुलै (वार्ता.) – सामाजिक माध्यमांद्वारे अल्पवयीन मुलींचे चलचित्र फिरवून त्यांचा लैंगिक छळ करणार्या टोळीतील ५ जणांना पोलिसांनी गोव्यातील विविध भागांतून कह्यात घेतले आहे. या प्रकरणी सलमान खान (रहाणार चिंबल), महेंदर सिंह (रहाणारा बेती), लेमन इस्लाम (कळंगुट), प्रणीत लोलयेकर (दवर्ली) आणि नितीन रेडकर (कळंगुट) यांना कह्यात घेण्यात आले आहे.
The distribution, possession or creation of CSAM is a serious criminal offence with severe legal consequences, and its existence perpetuates the exploitation and trauma suffered by innocent children. All citizens are urged to refrain from viewing any such content and report ASAP.
— Goa Police (@Goa_Cops) July 28, 2023
संशयितांमधील प्रणीत लोलयेकर व्यतिरिक्त अन्य परप्रांतीय आहेत. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार साहित्य (‘सी.एस्.ए.एम्.’ – Child Sexual Abuse Material) कायद्याचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी ही कारवाई केली. सायबर गुन्हे विभाग, गुन्हे अन्वेषण विभाग आणि जिल्हा पोलीस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.