म्हापसा – कळंगुट येथे समुद्रकिनारी महिला पर्यटकांचे अनुमतीविना व्हिडिओ आणि छायाचित्र काढणारा आकाश सरोज (वय ३२ वर्षे, रहाणारा रायबरेली, उत्तरप्रदेश) याला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. ४ जून या दिवशी दुपारी पर्यटन पोलीस समुद्रकिनार्यावर गस्त घालत असतांना आकाश सरोज हा महिलांचे व्हिडिओ काढत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलीस कर्मचार्याने संशयिताचा भ्रमणभाष संच पडताळला असता भ्रमणभाष संचामध्ये महिलांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे आढळून आली. चौकशीच्या वेळी संशयिताने महिलांच्या अनुमतीविना व्हिडिओ काढल्याची स्वीकृती दिली. या घटनेमुळे पर्यटनस्थळी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई !