गडचिरोलीतील खाण प्रकल्प रहित करावेत ! – आदित्य ठाकरे, नेते, ठाकरे गट

  • खाणकामामुळे वाघांचा अधिवास धोक्यात !

  • मुख्य वनसंरक्षकांच्या निलंबनाची मागणी !

    मुंबई – गडचिरोलीत खाण प्रकल्पांना अनुमती दिली जात असल्याने वाघांचा अधिवास धोक्यात आला आहे. पर्यावरण आणि प्राणी यांच्या संरक्षणासाठी हा निर्णय रहित करावा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली. त्यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहून मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना निलंबित करण्याची आणि खाण प्रकल्प रहित करण्याची मागणी केली. (अशी मागणी का करावी लागते ? प्राधिकरणाचे याकडे लक्ष नाही का ? – संपादक) वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्याकडे भूमी खाणकामासाठी देण्याविषयी विचारले होते. वन विभागाने ही जागा वन्यजीव मार्गिका नसल्याचा अहवाल दिला. यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची अनुमती आवश्यक आहे; पण ती न घेता अहवाल देण्यात आला.