गळ्यातील दागिने हिसकावणार्‍या कामिल आणि अहमद यांना अटक !

  • संत कबीरनगर (उत्तरप्रदेश) येथील घटना

  • अटक होतांना गुन्ह्याचा अभिमान असल्याचा अविर्भाव !

साखळी चोर महंमद कामिल आणि महंमद अहमद

संत कबीरनगर (उत्तरप्रदेश)  – येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावल्याच्या प्रकरणी पोलिसांनी महंमद कामिल आणि महंमद अहमद यांना अटक केली. आरोपींनी महिलेकडे प्यायला पाणी मागण्याच्या बहाण्याने तिच्या गळ्यातील साखळी खेचली. महिलेने या प्रकरणी पोलिसात तक्रार प्रविष्ट केली आहे.

अटकेनंतर आरोपींनी पोलिसांसमोरच स्वत:च्या मिशांना पीळ दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी ‘सोन्याची साखळी कुठे आहे ?’, असे विचारले असता ती २५ सहस्र रुपयांना विकल्याचे त्यांनी सांगितले. चोरांच्या चेहर्‍यावर पश्‍चात्तापाचा लवलेश नव्हता. पोलिसांची भीतीही त्यांच्या चेहर्‍यावर नव्हती.

दोघांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे. एकावर हत्या आणि ‘गँगस्टर अ‍ॅक्ट’च्या अंतर्गत गुन्हा नोंद आहे. अटकेच्या वेळी आरोपींकडे २ किलो गांजा, १ दुचाकी, ४ भ्रमणभाष संच, मिरची पावडर आणि सिमकार्ड आढळले. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

देशात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीच्या प्रत्येक क्षेत्रात मात्र बहुसंख्य ! अशांच्या लेखी कायद्याचे भयही नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे !