
मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या १७ पैकी ५ जागांवर महायुतीचे उमेदवार विनाविरोध निवडून आले आहेत. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रत्येकी २, तर भाजपचे १ उमेदवार विजयी झाले.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे विजयी झाले. पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे, अहिल्यानगर येथे भाजपचे प्राजक्त तनपुरे, ठाणे येथे शिवसेनेचे रवींद्र फाटक, यवतमाळ येथे शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी हे सर्व बिनविरोध विजयी झाले आहेत. उर्वरित १२ जागांसाठी १८ जून या दिवशी निवडणूक होणार आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक