जिल्हाधिकार्यांचे निर्देश रुग्णालयांनी योजनेचे फलक दर्शनी भागात लावावेत !
नाशिक – ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजने’च्या प्रभावी कार्यवाहीसाठी रुग्णालयांनी दर्शनी भागात फलक लावावेत. आरोग्य दूतांची बैठक व्यवस्था करावी, अशा सूचना येथील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आढावा बैठकीत केल्या.
भिवंडीतील आस्थापनाचा परवाना रहित !
मुंबई – पुणे येथे विषारी दारू दुर्घटनेप्रकरणी भिवंडीतील ‘रेक्स इंटरनॅनशल’ या मिथेनॉल उत्पादक आस्थापनाचा परवाना रहित करण्यात आला आहे. अन्न-औषध प्रशासनाने राज्यातील ९३७ मिथेनॉल उत्पादकांच्या पडताळणीची मोहीम हाती घेतली आहे.
नदीपात्रात आढळले पिस्तुल !
नाशिक – येथील नदी स्वच्छतेच्या मोहिमेच्या वेळी मंत्री गिरीश महाजन यांना नंदिनी नदीपात्रात एक गंजलेले पिस्तुल सापडले. पोलिसांनी पिस्तुल कह्यात घेतले आहे. या प्रकरणी चौकशी चालू आहे.
उघड्यावर कचरा टाकणार्यांना दंड !
पनवेल – कळंबोली परिसरात स्वच्छता राखण्यासाठी आणि उघड्यावर कचरा टाकणार्यांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनाने दंडात्मक कारवाई चालू केली आहे. (आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम ! – संपादक) या कारवाईच्या वेळी पालिका कर्मचार्यांना शिवीगाळ करणार्याला पोलिसांच्या कह्यात देण्यात आले.
बनावट विदेशी मद्यासह लाखो रुपयांचा मुद्देमाल कह्यात !
नारायणगाव (जिल्हा पुणे) – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नारायणगाव पथकाने ३० मे या दिवशी शिरोली खुर्द (ता. जुन्नर) येथे धाड घालून बनावट मद्याच्या ३२९ बाटल्या, बनावट झाकणे, मोटार असा ४ लाख ५४ सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेऊन गोविंद जाधव आणि भंगार व्यावसायिक रवींद्र माळी यांना अटक केली आहे, अशी माहिती शुल्क निरीक्षक शरद जाधव यांनी दिली.
कांदिवली येथील मंदिरात चोरी करणाऱ्या शेखला अटक !
मुंबई – कांदिवली पश्चिम येथील महात्मा गांधी मार्गावरील लक्ष्मीनारायण मंदिरात दानपेटी फोडून चोरी करणाऱ्या अरमान शेख (वय १९ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे.
कांदिवली पोलीस ठाण्यात या प्रकरणी विपुल जेटानिया यांनी तक्रार प्रविष्ट केली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही पडताळून धर्माध आरोपीला पकडले. त्याच्या विरोधात अन्य ठिकाणीही गुन्हे नोंद आहेत. तो मंदिरे आणि दुकाने येथे चोऱ्या करत होता.
संपादकीय भूमिका : हिंदूची मंदिरे सुरक्षित रहाण्यासाठी धर्मांधाला त्वरित कठोर शिक्षा होणे आवश्यक !

नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन