मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी अतिक्रमण हटवण्यास विरोध करणार्यांना खडसावले !

कणकवली – शहरातील अतिक्रमण हटवण्याविषयी चेतावणी दिल्यानंतर कणकवली नगरपंचायत प्रशासनाने ४ जूनपासून प्रत्यक्ष कारवाई करण्यास प्रारंभ केला. ही कारवाई ५ जून या दिवशीही चालू होती. मुख्य बाजारपेठेत असलेली अतिक्रमणे संबंधितांनी त्वरित हटवावी अन्यथा नगरपंचायतीकडून जे.सी.बी.च्या साहाय्याने ती हटवण्यात येतील, अशी चेतावणी मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिली आहे. प्रशासनाचा आक्रमक पवित्रा पाहून अनेकांनी स्वतःहून अतिक्रमण हटवण्यास प्रारंभ केला.
नगरपंचायतीच्या पथकाने मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध भागांची पहाणी करून अतिक्रमण करणार्यांना ते हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाखाली काही व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात भूमी अडवून ठेवल्याचे आढळून आले. एका व्यक्तीने ४ दुकाने होतील एवढा भाग व्यापल्याचे निदर्शनास येताच मुख्याधिकारी पाटील यांनी थेट कारवाई करून अतिक्रमण हटवले.
या कारवाईच्या वेळी काही जणांशी मुख्याधिकार्यांशी शाब्दिक बाचाबाची झाली; मात्र अतिक्रमणाविषयी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत मुख्याधिकार्यांनी त्यांची कानउघाडणी केली.
बस्थानकासमोर पुलाखाली श्री गणेशमूर्तीच्या पूजनासाठी उपलब्ध करून दिलेली भूमी अन्य व्यावसायिक कारणांसाठी वापरली जात असल्याचे आढळून आले. त्या वेळी ‘संबंधित प्रकार तात्काळ बंद करून भूमी रिकामी करा’, असे निर्देश संबंधितांना देण्यात आले.
बंदी असलेले प्लास्टिक वापरणार्यांवरही कारवाई
या कारवाईच्या वेळी काही व्यावसायिकांकडे बंदी असलेले प्लास्टिक असल्याचे आढळल्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या कारवाईत सुमारे २० सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
नगराध्यक्षांचा हस्तक्षेप करण्यास नकार
शहरातील स्टॉलधारकांनी नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट घेऊन स्टॉल हटवण्यासाठी काही दिवसांचा कालावधी देण्याची मागणी केली; मात्र नगरपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून ही कारवाई चालू असल्याने त्यात हस्तक्षेप करता येणार नसल्याचे नगराध्यक्ष पारकर यांनी स्पष्ट केले.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या