माकपच्या खासदाराच्या विरोधात ट्वीट केल्याचा परिणाम
चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूचे भाजपचे राज्य सचिव एस्.जी. सूर्या यांना सायबर क्राइम पोलिसांनी अटक केली. सूर्या यांनी मदुराई येथील माकपचे खासदार व्यंकटेशन् यांच्या संदर्भात एक ट्वीट केले होते. त्यावरून त्यांना अटक करण्यात आली. या अटकेविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी तमिळनाडू सरकारवर टीका केली आहे.
In Tamil Nadu, BJP state secretary Surya has been arrested for tweeting against an MP
But the Communists and Congressmen who call Modi as Hitler, who lecture about democracy and freedom of speech will not speak against this
That’s not hypocrisy pic.twitter.com/xsf4o5aVIh
— Post Card (@postcard_news) June 17, 2023
त्यांनी म्हटले की, सूर्या यांनी इतकीच चूक होती की, त्यांनी साम्यवादी आणि द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ) यांच्या सहकार्यांचा द्वेष आणि दुटप्पीपणा उघड केला होता. अटकेमुळे आम्ही थांबणार नाही. आम्ही सत्य सर्वांच्या समोर आणतच रहाणार.
संपादकीय भूमिकाअन्य वेळी अभिव्यक्तीस्वातंत्र्याची टिमकी मिरवणारे अशा वेळी गप्प बसतात, हे लक्षात घ्या ! |