आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबवण्यात येणार्‍या ‘हरित महाराष्ट्र – ३०० कोटी वृक्षारोपण’ मोहिमेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला आहे. या अंतर्गत ‘जागतिक पर्यावरण दिना’चे औचित्य साधत आरे कँप परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. आरे परिसरातील ८० एकर रिक्त जागेत ५ लाख झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

आरेला प्रत्यक्षात हिरवाईने बहरलेले आणि भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असे जंगल निर्माण करणार आहोत, अशी माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री अधिवक्ता आशिष शेलार यांनी केले.