दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कत्तलीपासून गोवंशियांची मुक्तता !; एस्.आर्.पी.एफ्. भरती प्रक्रिया थांबवण्यासाठी युवकांचा गोंधळ !…

जालना येथे ‘एस्.आर्.पी.एफ्.’ची (राज्य राखीव पोलीस दलाची) २४८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यामध्ये मैदानी चाचणीमधील १०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात गैरप्रकार होत असल्याचे विद्यार्थ्यांना वाटले.

पोलिसांकडून १३ धर्मांधांना अटक, तर ६० धर्मांधांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद !

धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण करण्याचे धाडसच होणार नाही, अशी कठोर कारवाई त्यांच्यावर पोलिसांनी करावी !

Gomata On Bakri-Eid Poster : बकरी ईदच्या शुभेच्छा देणार्‍या भित्तीचित्रावर हिरव्या रंगात गोमातेवर दाखवली मशीद !

 रेड्डी यांनी मुसलमानांच्या श्रद्धास्थानांचा असा अवमान केला असता, तर एव्हाना त्यांच्या विरोधात ‘सर तन से जुदा’चा (शिरच्छेदाचा) फतवा निघाला असता !

कुंदापूर (कर्नाटक) येथील मंदिराच्या आवारातील गायींच्या चोरीचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला !

कमलाशिले मंदिरात रात्री उशिरा २ चोरट्यांनी मंदिराच्या कुंपणाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. या परिसरात बांधलेल्या ३ गायींची चोरी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

Cleric Arrested : जनावरांची ‘कुर्बानी’ देण्याच्या सूचीत गायीचाही समावेश करणार्‍या मौलवीला अटक !

मौलवी अब्दुल रहीम राठोड याने बकरी ईदच्या निमित्ताने ज्या जनावरांची कुर्बानी दिली जाते, त्यांची सूची सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली होती. त्या सूचीत त्याने गायीचाही समावेश केला होता.

गोपालनाचे महत्त्व !

गायीच्या तुपाचे हवन केल्याने आकाश आणि वायू यांची शुद्धी तर होतेच; पण योग्य प्रमाणात वृष्टीही होते. जगातील अनेक देशांमध्ये हवन चिकित्सेवर (होमोथेरपी) भर दिला जात आहे.

देशी गोवंशियांच्या  संख्येत होत आहे घट !

पशूधन आणि कुक्कुटपालन अहवालानुसार गेल्या ६ वर्षांत देशात देशी गायींच्या संख्येत ५.५ टक्के घट झाली आहे. दुसरीकडे विदेशी आणि संकरित गायींची संख्या वाढली आहे. त्यामुळे कायदे कितीही बनवले, तरी देशी गायींची संख्या न्यून होत आहे.

हिंदु राष्ट्रात प्रत्येक विद्यालय, महाविद्यालय किंवा देवालय, तसेच सर्व ठिकाणी गोशाळा सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा !

वर्तमानकाळातील निधर्मी शिक्षणपद्धतीने आपल्यातील गोपालनाचा संस्कारच नष्ट केला आहे. जर शक्य असेल, तर आपल्या घराच्या ठिकाणी किंवा वसाहतीमध्ये गोपालनास आरंभ करावा. विद्यालयात किंवा जवळच्या देवालयात गोशाळा सिद्ध करावी आणि सर्वांनी मिळून तिची सेवा करावी

गोरक्षण, हे हिंदूंसाठी भूमीकर्तव्य आणि धर्मकर्तव्यच आहे !

‘गोपालन करणार्‍या श्रीकृष्णामुळे त्या वेळी भारत समृद्ध होता. आता सर्वपक्षीय सरकारांनी सर्वत्र गोवंश हत्या करणारे कत्तलखाने उभारल्यामुळे भारत दरिद्री झाला आहे आणि देश देशोधडीला लागला आहे.’

विदेशी गायीचे तूप तामसिक आणि विषासमान असणे, तर देशी गायीचे तूप सात्त्विक आणि अमृतासमान असणे

१. ‘देशी गायीच्या तुपाला ‘अमृत’ म्हटले आहे; कारण ते तारुण्य कायम राखते आणि वार्धक्याला दूर ठेवते.