आपत्काळात गोमाता वरदान ठरणार !

येणार्‍या आपत्काळात गोमाता आपल्यासाठी वरदान असल्याचे सिद्ध होईल; कारण तिच्या शेणापासून आपल्याला इंधन प्राप्त होते. जर भाजीपाला उपलब्ध झाला नाही, तर आपण दूध-दही यांच्या समवेत भात आणि पोळी-भाकरी खाऊ शकतो.

‘केवळ एका गायीपासूनही विपुल धन कसे मिळवता येऊ शकते ?’, याचे गणित

गोमाता दुधासह गोमूत्र आणि शेणही देत असते. दूध न देणारी भाकड गायसुद्धा तिचे गोमूत्र आणि गोमय  (शेण) यांच्या आधारे गोपालकाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवू शकते. पुढील आर्थिक गणित सर्वत्रचे गोपालक आणि गोशाळांचे व्यवस्थापक यांनी लक्षात घेतल्यास भारतातील गोशाळांवर दान मागण्याची पाळी कधीही येणार नाही.

गोमाता आणि गोपालन यांची सद्यःस्थितीत असणारी अपरिहार्यता !

‘वास्तुदेवतेला प्रसन्न केल्यामुळे घरात चांगली स्पंदने निर्माण होतात. ती स्पंदने देवतेचे तत्त्व आकर्षित करतात. या लेखात वास्तूमध्ये गोमाता असणे का आवश्यक आहे, हे सांगते.

शहरांतून गोपालन कसे करावे ?

प्रत्येक कॉलनीत एक वॉचमन असतो. त्याकरता शेड असतेच. तशीच तिथे शेड बांधून गाईची व्यवस्था का करता येणार नाही ?’

‘गोवंश’ रक्षणासाठी आपण सामान्य व्यक्ती काय करू शकतो ?

प्रत्येक घरी निदान एका गायीचे पालन करणे, ते शक्य नसल्यास गोशाळेतील एखाद्या गायीच्या पालन-पोषणाचा व्यय करणे
पंचगव्यापासून निर्माण झालेले स्वास्थ्यवर्धक लाभदायी असे दंतमंजन, साबण, उटणे, धूप, मच्छर निरोधक उदबत्ती अशा उत्पादनांचा नित्य वापर करणे

गोपालनाचे अर्थकारण ! 

गोपालन या क्षेत्रातील बारकावे, सत्यस्थिती माहिती नसल्याने अनेकदा ‘इतकं महाग दूध/तूप ?’ असे प्रश्न विचारले जातात. कित्येकदा लोक या क्षेत्रासंदर्भात अकारण गैरसमज पसरवत असतात. त्यांच्यासाठी नव्हे; खरोखरच ‘अथातो जिज्ञासा’ असणार्‍या सामान्य जनतेसाठी हा लेखप्रपंच.

विदेशी गाय आणि भारतीय गाय यांतील भेद !

‘भारतीय गाय माणसाची नित्य सहचारिणी आहे. आरंभापासूनच या गायींना माणसाचे प्रेम मिळाले आहे; परंतु विदेशी गायींचे तसे नाही. विदेशी गायी पूर्वी बरीच वर्षे जंगलामध्ये हिंसक पशूंच्या रूपाने फिरून नंतर माणसाच्या घरी पाळल्या जाऊ लागल्या.

सांगली येथे कत्तलीसाठी नेणारी ६ गायींची वासरे गोरक्षकांनी पकडली !

गोवंश हत्याबंदी कायदा राज्यात लागू असूनही गोवंश रक्षणासाठी गोरक्षकांना प्रयत्न करावे लागणे, ही पोलिसांची निष्क्रीयताच !

Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati : गोहत्या थांबल्या नाहीत, तर ५ वर्षांनंतर गायी चित्रात पहाव्या लागतील !

धर्मशास्त्र आणि कायदे यांनुसार जे गुन्हे अन् पाप करतात त्यांचे समर्थन करणेही पाप आहे. त्यामुळे गोरक्षणासाठी झटणार्‍या पक्षांना मतदान करा, असे आवाहन शंकराचार्य अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांनी केले.

ब्राझीलमध्ये भारतीय जातीची ओंगोले गाय ४० कोटी रुपयांना विकली !

भारतात गायींचे सरासरी मूल्य २ सहस्र ५०० रुपये ते ११ सहस्र रुपये आहे; पण दक्षिण अमेरिकी देश असलेल्या ब्राझीलमध्ये भारतीय जातीची ओंगोले गाय तब्बल ४० कोटी रुपयांना विकली गेली.