कुंदापूर (कर्नाटक) येथील मंदिराच्या आवारातील गायींच्या चोरीचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला !

सीसीटीव्हीमध्ये गायी चोरतांना चोरटे दिसत आहे.

कुंदापूर (कर्नाटक) – येथील कमलाशिले मंदिरात रात्री उशिरा २ चोरट्यांनी मंदिराच्या कुंपणाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. या परिसरात बांधलेल्या ३ गायींची चोरी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

येथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना दिसून आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने मंदिराच्या ठिकाणी गेले. पोलीस आल्याची माहिती मिळताच चोरटे तेथून पळून गेले.