विदेशी गायीचे तूप तामसिक आणि विषासमान असणे, तर देशी गायीचे तूप सात्त्विक आणि अमृतासमान असणे

१. ‘देशी गायीच्या तुपाला ‘अमृत’ म्हटले आहे; कारण ते तारुण्य कायम राखते आणि वार्धक्याला दूर ठेवते.

२. डोके दुखत असतांना अंगात उष्णता वाढते. त्या वेळी गायीच्या तुपाने पायाच्या तळव्यांना चोळल्यावर डोकेदुखी बरी होते.

३. नाकात तुपाचे थेंब घातल्यावर नाकाचा कोरडेपणा दूर होतो आणि बुद्धी तरतरीत होते, मानसिक शांती मिळते आणि स्मरणशक्ती चांगली होते. ‘ॲलर्जी’ नष्ट होते. ‘मायग्रेन’च्या वेदना थांबतात.

४. गायीचे तूप छातीवर चोळल्यावर लहान मुलांच्या छातीतील कफ बाहेर निघण्यास साहाय्य होते.

 

५. सर्पदंश झाल्यानंतर १०० ते १५० ग्रॅम तूप पाजावे आणि त्यावर जेवढे जाईल तेवढे कोमट पाणी पाजावे. त्यामुळे उलट्या आणि जुलाब होऊ लागतात अन् सापाचे विष उतरण्यास साहाय्य होते.

६. जर अशक्तपणा अधिक वाटत असेल, तर एक पेलाभर दुधात एक चमचा गायीचे तूप आणि थोडीशी साखर घालून नियमितपणे प्यावे.

७. गायीच्या तुपाचे नियमित सेवन केल्यामुळे पित्त (ॲसिडीटी) आणि बद्धकोष्ठता यांच्या व्याधी उणावतात.

८. ज्याला हृदयविकाराचा त्रास आणि स्निग्ध पदार्थ न खाण्याचे पथ्य असेल, त्याने गायीचे तूप खावे. त्यामुळे हृदय बळकट होते.

९. गायीच्या तुपाने वजन संतुलित होते, म्हणजे बारीक व्यक्तीचे वजन वाढते आणि लठ्ठ व्यक्तीचा लठ्ठपणा न्यून होऊन वजन घटते.

१०. गायीच्या तुपाने बळ आणि वीर्य वाढते. शारीरिक आणि मानसिक शक्तीमध्येही वाढ होते.

११. देशी गायीच्या तुपामध्ये कर्करोगाशी लढण्याची क्षमता असते. तुपाच्या सेवनाने स्तन आणि आतड्यांच्या गंभीर अशा कर्करोगापासून रक्षण होते. गायीचे तूप ना केवळ कर्करोग निर्माण होण्यापासून रोखते (प्रतिबंध करते), तर कर्करोग शरिरात पसरण्यालाही आश्चर्यकारकपणे प्रतिबंध करते.

– श्री. उकेशसिंह चौहान (साभार : ‘क्षात्रधर्म विचार मंथन’)

वर्तमानकाळात अधिकांश हिंदू देशी गायीचे तूप नाही, तर विदेशी गायीचे देशी तूप उपयोगात आणतात. ‘गायीचे देशी तूप’ याचा अर्थ ते तूप जरी आपल्या देशात सिद्ध केलेले असले, तरी ‘ती गाय देशी नव्हे’, तर विदेशीसुद्धा असू शकते, हे वास्तव लक्षात घ्यायला हवे. विदेशी गायीच्या तुपात सात्त्विकता नसते. देशी गायीचे तूप सात्त्विक आणि अमृतासमान असते. ते किमान १ सहस्र २०० रुपये प्रती किलो या दराने मिळते. विदेशी गायीचे तूप तामसिक आणि विषासमान असते. ते तूप खाण्यायोग्य नसते.