|
कर्णावती – मौलवी अब्दुल रहीम राठोड याने बकरी ईदच्या निमित्ताने ज्या जनावरांची कुर्बानी दिली जाते, त्यांची सूची सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली होती. त्या सूचीत त्याने गायीचाही समावेश केला होता. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. अब्दुल हा कर्णावतीतील भरूच येथील रहिवासी आहे.
अब्दुल याने ही सूची प्रसारित केल्यानंतर त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आणि त्याच्यावर कारवाई केली. शांतता भंग केल्याच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वर्ष २०२२ मध्येही केली होती अटक !
अब्दुल याला वर्ष २०२२ मध्येही अटक करण्यात आली होती. आदिवासींचे बलपूर्वक धर्मांतर केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. याप्रकरणी तो जामीनावर बाहेर होता. (हे प्रकरण जलदगतीने निकालात लागून अब्दुल याला शिक्षा झाली असती, तर त्याच्या धर्मांध कारवाया वाढल्या नसत्या ! – संपादक)