हिंदु राष्ट्रात प्रत्येक विद्यालय, महाविद्यालय किंवा देवालय, तसेच सर्व ठिकाणी गोशाळा सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा !

वर्तमानकाळातील निधर्मी शिक्षणपद्धतीने आपल्यातील गोपालनाचा संस्कारच नष्ट केला आहे. जर शक्य असेल, तर आपल्या घराच्या ठिकाणी किंवा वसाहतीमध्ये गोपालनास आरंभ करावा. विद्यालयात किंवा जवळच्या देवालयात गोशाळा सिद्ध करावी आणि सर्वांनी मिळून तिची सेवा करावी; कारण अनेक ठिकाणच्या गोशाळांमध्ये गोवंशियांच्या देखरेखीसाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. गोमाता, तसेच तिच्याकडून मिळणारे पंचगव्य यांचे महत्त्व, तिची सेवा केल्यामुळे होणारे लाभ यांविषयी समाजात अनभिज्ञता आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्रात प्रत्येक विद्यालय, महाविद्यालय किंवा देवालय, तसेच सर्व ठिकाणी गोशाळा सिद्ध करण्याचा प्रयत्न असेल. तसे झाल्यास आजच्यासारखी केविलवाणी स्थिती निर्माणच होणार नाही.