‘ड्रग माफिया’ ललित ‘ससून रुग्‍णालया’मध्‍ये रहाण्‍यासाठी प्रतिदिन ७० सहस्र रुपये देत असल्‍याचे उघड !

प्रकृती अस्‍वास्‍थ्‍याचे कारण देत हा गेली १६ मास ‘ससून’मधील विभाग क्र. १६ मध्‍ये उपचार घेत होता. तेथूनच तो ‘मेफेड्रॉन’ या अमली पदार्थाच्‍या विक्रीची यंत्रणा राबवत होता.

केंद्रीय यंत्रणांकडून बंगाल, तेलंगाणा आणि तमिळनाडू येथे धाडी !

तृणमूल काँग्रेसच्या मंत्र्याच्या निवासस्थानी धाड

सिंधुदुर्ग : तुळसुली येथील शैक्षणिक संस्थेत २१ लाख रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणी कनिष्ठ लिपिकावर गुन्हा नोंद !

तुळसुली येथील लिंगेश्वर माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय चालवणार्‍या तुळसुली ऐक्यवर्धक संघ या संस्थेच्या बचत खात्यातील रकमेचा अपहार केल्याच्या प्रकरणी मुकुंद आत्माराम वारंग यांच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

देहली पोलिसांकडून पत्रकारांच्या निवासस्थानांसह ३५ ठिकाणी धाडी !

जर या पत्रकारांनी चीनकडून पैसे घेऊन भारतविरोधी काम केले असेल, तर अशांना फाशीचीच शिक्षा केली पाहिजे !

माझ्या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीच्या प्रमाणपत्रासाठी साडेसहा लाख रुपयांची लाच द्यावी लागली ! – विशाल, तमिळ अभिनेते

‘हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या चित्रपटांना या मंडळाकडून प्रमाणपत्र दिले जाते आणि त्याला हिंदूंनी विरोध केल्यावर त्याची नोंदही घेतली जात नाही, त्या वेळीही अशीच लाच घेऊन हे चित्रपट संमत केले जातात का ?’, असा प्रश्‍न आता उपस्थित होतो !

पुणे शहरात भ्रमणभाष आस्‍थापनांना नोटिसा !

 मुद्रांक शुल्‍क आणि नोंदणी विभागाने एका आस्‍थापनाला ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे . ग्राहकांकडून भरमसाठ पैसे उकळणार्‍या भ्रष्‍ट भ्रमणभाष आस्‍थापनांंवर कडक कारवाई आवश्‍यक !

बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने दोघांचा मृत्यू !

बिहारमध्ये दारूबंदी असतांना तथे सहजतेने दारू मिळते. याचाच अर्थ तेथील पोलीस आणि प्रशासन किती भ्रष्ट आहेत, हे स्पष्ट होते !

अशा देशद्रोही पोलिसांना फाशीची शिक्षा करा !

श्रीनगर पोलिसांनी पोलीस उपायुक्‍त शेख आदिल मुश्‍ताक याला जिहादी आतंकवाद्याला साहाय्‍य करणे आणि भ्रष्‍टाचार, या प्रकरणी अटक केली आहे.

‘टोईंग’ केलेली वाहने सोडवतांना दंडाची भीती दाखवून पोलीस पैसे उकळतात !

मुंबईत नियमित सहस्रावधी वाहने ‘टोईंग’ केली जातात. त्‍यामुळे यामध्‍ये मुंबईत अशा प्रकारे कुठे कुठे दंडाची भिती दाखवून वाहतूक पोलीस नागरिकांची लुटमार करत आहेत ? याचा शोध वाहतूक विभागाने घेऊन अशा भ्रष्ट पोलिसांवर कारवाई करणे अपेक्षित आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे तलाठी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या नक्कलची (कॉपीची) ३ लाख रुपयांना विक्री !  

परीक्षार्थींना उत्तरे पुरवणार्‍या टोळीमध्ये ७ जण असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत असल्याने पोलीस त्याच दिशेने अन्वेषण करत आहेत.