गोव्यात ३० टक्के शॅक देहलीवाल्यांना अनधिकृतपणे चालवण्यास दिले जातात ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

पर्यटन खात्यातील अधिकारी किंवा एखादी व्यक्ती शॅकधारकांकडून पैसे मागत असल्यास तक्रार का प्रविष्ट केली जात नाही ? एकीकडे पर्यटन खात्यावर आरोप करायचे आणि दुसरीकडे अवैध कृती चालूच ठेवायची, हे चालणार नाही.

गोवा : कारागृह महानिरीक्षक ओमवीर सिंह यांची कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाला आकस्मिक भेट

यात कारागृह रक्षक किंवा अधिकारी यांच्या सहभाग होता कि त्यांना चकवून या वस्तू बंदीवानांपर्यंत पोचल्या, याचे अन्वेषण करावे आणि वरीलपैकी कोणतेही कारण असले, तरी त्यानुसार कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !

भिवंडी येथील लाचखोर नायब तहसीलदार कह्यात !

भिवंडी येथील नायब तहसीलदार सिंधू उमेश खाडे यांना ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे.

नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या विरोधात न्यायालयात दावा प्रविष्ट करणार ! – सीताराम गावडे, संपादक, कोकण लाईव्ह ब्रेकिंग

नगरपालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच जलतरण तलावात बुडून एका युवकाला जीव गमवावा लागला.

छत्रपती संभाजीनगर येथे वाहनचालकांकडून पोलिसांच्‍या वसुलीचा व्‍हिडिओ विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्‍याकडून ट्‍वीट !

जी गोष्‍ट अंबादास दानवे यांनी दिसते, ती गोष्‍ट सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना दिसत नाही का ? पोलीस आंधळेपणाची भूमिका का घेत आहेत ? पोलिसांच्‍या अशा भ्रष्‍ट वर्तनामुळे जनतेचा पोलिसांवरील विश्‍वास उडत आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील पंतप्रधान आवास योजना घोटाळ्‍याप्रकरणी कृषी आयुक्‍तांना ‘ईडी’ची नोटीस !

पंतप्रधान आवास योजना घोटाळ्‍यात अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) तत्‍कालीन जिल्‍हाधिकारी तथा कृषी आयुक्‍त सुनील चव्‍हाण यांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. या घरकुल योजनेत १ सहस्र कोटींचा भ्रष्‍टाचार झाल्‍याचा आरोप झाला होता.

संरक्षण दलाच्या विमान खरेदीत भ्रष्टाचार केल्याच्या प्रकरणी रोल्स रॉइस आस्थापन आणि सकारी अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद

भारतात असे कुठले क्षेत्र नाही जेथे भ्रष्टाचार होत नाही ?

आय.पी.एल्. सामन्यावर सट्टा लावणार्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई !

पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने खराडी परिसरातील ‘गॅलेक्सी वन’ या सोसायटीमधील नवव्या माळ्यावरील एका सदनिकेवर धाड टाकून आय.पी.एल्. क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणार्‍या टोळीला कह्यात घेतले.

छत्रपती संभाजीनगर येथे बढती मिळाल्याच्या दुसर्‍याच दिवशी पोलिसाने घेतली लाच !

अशा भ्रष्ट पोलीस कर्मचार्‍यांना बढती मिळतेच कशी ? वरिष्ठ पोलीस अधिकारी या कर्मचार्‍यांच्या कामांचा आढावा घेत नाहीत का ? अटक केलेल्या दोन्ही भ्रष्ट फौजदारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

जालना येथे धर्मादाय आयुक्तालयातील निरीक्षकास लाच घेतल्याप्रकरणी अटक !

२३ मे या दिवशी यातील १० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जंघाळे यांना रंगेहाथ पकडून अटक केली.