इंग्रजांची ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती विरोधक वापरत आहेत ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

सर्वांची प्रगती व्हावी, यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. इंग्रजांनी ‘फोडा आणि राज्य करा’, अशी नीती वापरली अन् आता विरोधकही तीच नीती वापरत आहेत. त्यात ते सफल होणार नाहीत. वैयक्तिक स्वार्थासाठी विरोधक फूट पाडत आहेत, असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी’ यांनुसार बांगलादेशात परत न पाठवण्याची वेश्याव्यवसायातून सुटका झालेल्या बांगलादेशी युवतीची याचना !

गोव्यातील वेश्याव्यवसायात बांगलादेशी युवतींचा मोठ्या प्रमाणावर भरणा आहे. देशात ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ लागू झाल्याने आणि ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी’ कायदा येणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर वेश्याव्यवसायातून सुटका झालेल्या युवतींना त्यांना बांगलादेशात परत पाठवले जाणार असल्याची भीती वाटू लागली आहे.

उत्तरप्रदेशातील विविध जिल्हा प्रशासनाकडून १३० धर्मांध दंगलखोरांना ५० लाख रुपयांच्या हानीभरपाईसाठी नोटिसा

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी यांविरोधात उत्तरप्रदेशमधील विविध जिल्ह्यांत हिंसाचार करण्यात आला होता. या हिंसाचाराच्या वेळी सार्वजनिक मालमत्तेची हानी केल्याप्रकरणी येथील विविध जिल्ह्यातील प्रशासनाने एकूण १३० धर्मांध दंगलखोरांना आर्थिक वसुलीच्या नोटीसा पाठवल्या आहेत.

कोपरगाव (जिल्हा नगर) नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांचा नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा !

‘नागरिकत्व सुधारणा कायद्याला आमचे समर्थन आहे. ‘सरकारने समान नागरी कायदा ही लवकरात लवकर लागू करावा’, ही आमची मागणी आहे, असे मत येथील नगराध्यक्ष श्री. विजयराव वहाडणे यांनी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केले.

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ कल्याणकर एकवटले

केंद्रशासनाने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ २६ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता येथील पश्‍चिमेकडील डॉ. हेगडेवार चौकातून मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात मोठ्या संख्येने कल्याणकर नागरिक, तसेच विविध संघटना तथा भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

भारतद्रोही दंगली अन् त्यांचे पाठीराखे !

भारतात देशद्रोही आणि पर्यायाने हिंदुद्रोही यांना ओळखणे पुष्कळ सोपे आहे. आजच्या घडीला नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी देशातील वातावरण बिघडवले जात आहे. एखादा कायदा हिंदूंना पूरक असला की, देशावर अशा प्रकारे परिस्थिती ओढवते.