Thalapathy Vijay CAA : (म्हणे) ‘तमिळनाडू सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करू नये !’  – अभिनेते विजय थलपती

दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेते विजय थलपती यांची राष्ट्रघातकी मागणी !

अभिनेते विजय थलपती

चेन्नई (तमिळनाडू) – दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेते विजय थलपती यांनी तमिळनाडू सरकारकडे नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू करू नये, अशी मागणी केली आहे.

थलपती विजय यांनी एक निवेदन प्रसारित केले आहे. यात म्हटले आहे की, अजूनही आपल्या देशात सर्व नागरिक सामाजिक सद्भावाने रहात आहेत. (या कायद्यामुळे यात काय बाधा येणार आहे ? हे थलपती यांनी स्पष्ट करायला हवे !  – संपादक) अशा वेळी ‘सीएए’सारख्या कायद्याची आवश्यकता नाही आणि असा कायदा स्वीकार्ह नाही. हा कायदा तमिळनाडूमध्ये लागू होणार नाही, याकडे नेत्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. विजय यांनी ते राजकारणात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले असून नवीन पक्षाची स्थापना केली आहे. (द्रमुकप्रमाणे हा पक्षही हिंदूंच्या मुळावर उठणारा असणार, हे विजय यांच्या या विधानावरून लक्षात येते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

ज्या विषयाचा आपल्याला अभ्यास नाही, त्याविषयी अनावश्यक विधाने करू नयेत, हे विजय थलपती यांना कुणी तरी सांगायला हवे ! जर या कायद्यात श्रीलंकेतून येणार्‍या निर्वासित तमिळी नागरिकांचा समावेश असता, तर थलपती यांनी असेच म्हटले असते का ?