श्रीलंकेतील भारत आणि जपान यांचा संयुक्तरित्या होणारा ‘इस्टर्न कंटेनर टर्मिनल’ प्रकल्प रहित

भारताच्या दृष्टीने ‘इस्टर्न कंटनेर टर्मिनल’ हा प्रकल्प चीनला शह देण्यासाठी महत्त्वाचा होता. श्रीलंकेने हा प्रकल्प रहित केला असला, तरी भारत आणि जपानसमवेत ‘वेस्टर्न कंटेनर टर्मिनल’ उभारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अमेरिकेची धोरणे !

ट्रम्प यांचे काही निर्णय बायडेन यांना चुकीचे वाटणे स्वाभाविक असले, तरी एकूण चीनविरोधी नीती अयोग्यच होती आणि ती पालटायला हवी, असे ते कदापि म्हणू शकणार नाहीत. ते अमेरिकेच्या हिताचे होणार नाही.

चीनकडून शेजार्‍यांना धमकावणे आणि दहशत पसरवणे यांमुळे आम्ही चिंतेत ! – अमेरिका

अमेरिकेने केवळ अशी वक्तव्ये करून गप्प न बसता स्वतः चीनवर कारवाई करणे अपेक्षित आहे !  

बलुची लोकांचे आंदोलन आणि भारताचा प्रभाव नष्ट करण्यासाठी चीनकडून माझी नियुक्ती ! – पाकचे सैन्यप्रमुख जनरल अयमान बिलाल यांची स्वीकृती

यातून पाकिस्तान चीनला विकला गेला आहे, असेच स्पष्ट होते ! पुढे चीनने पाकच्या सैन्याला भारताच्या विरोधात युद्ध करण्यास प्रवृत्त केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

चीनचा बटीक झालेला पाक !

चीनने मला बलुची लोकांचे आंदोलन चिरडण्यासाठी, तसेच भारताचा प्रभाव नष्ट करण्यासाठी येथे तैनात केले आहे, असे विधान पाकचे सैन्यप्रमुख मेजर जनरल अयमान बिलाल यांनी केले आहे.

शत्रूराष्ट्रांचे नवीन युद्धतंत्र : आंदोलकांचा आतंकवाद !

सध्या ‘आंदोलकांचा आतंकवाद’ हा युद्धाचा नवीन प्रकार अधिक लोकप्रिय होत आहे. आंदोलन करण्याचा अधिकार घटनेने तो प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे; परंतु जेव्हा ते आंदोलन सार्वजनिक किंवा खाजगी मालमत्तेला हानी पोचवते, तेव्हा ते अवैध असते.

(म्हणे) ‘तैवानने स्वातंत्र्याची घोषणा करण्याचा अर्थ युद्ध !’- चीनची धमकी

चीनचे त्याच्या शेजारी असणार्‍या २४ देशांशी सीमावाद आहे आणि त्यातून त्याची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा स्पष्ट झाली आहे. चीनच्या विरोधात आता सर्वच देशांनी एकत्र येऊन त्याला धडा शिकवण्याची आवश्यकता आहे !

ड्रोन युद्धातील भारताची आश्‍चर्यकारक गरुडझेप !

१५ जानेवारी २०२१ या दिवशी भारतीय सैन्याने संचलन केले त्यात त्याने ड्रोन युद्धाचे प्रदर्शन केले. या वेळी ७५ ड्रोन आकाशात झेपावून त्यांनी भूमीवरील शत्रूच्या विविध लक्ष्यांवर एकाच वेळी आक्रमण कसे करतात, याचे प्रात्यक्षिक केले. यातून भारताची मोठी क्षमता जगासमोर आली.

चीनचा अपप्रचार हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्याधिकारी तिबेटी संस्कृतीचा अभ्यास करणार !

चीनकडून चालू असलेला अपप्रचार हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्याने तिबेटचा इतिहास, तेथील संस्कृती आणि भाषा जाणून घेण्याची रणनीती बनवली आहे.

सिंगापूर येथील मशिदींमध्ये आक्रमण करण्याचा कट रचणार्‍या एका भारतीय वंशाच्या ख्रिस्ती मुलाला अटक

२ मशिदींमध्ये आक्रमण करण्याच्या सिद्धतेत असणार्‍या भारतीय वंशाच्या १६ वर्षीय मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. तो सिंगापूरचा नागरिक असून तो प्रोटेस्टंट ख्रिस्ती धर्मीय आहे.