चीनचा अपप्रचार हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्याधिकारी तिबेटी संस्कृतीचा अभ्यास करणार !

नवी देहली – चीनकडून चालू असलेला अपप्रचार हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्याने तिबेटचा इतिहास, तेथील संस्कृती आणि भाषा जाणून घेण्याची रणनीती बनवली आहे. प्रत्यक्ष नियंत्रणरेषेच्या दोन्ही बाजूला असलेल्या तिबेटचा खोलात जाऊन अभ्यास करण्याच्या सूचना सैन्याधिकार्‍यांना दिल्या जाणार आहेत.

आर्मी ट्रेनिंग कमांड (ए.आर्.टी.आर्.ए.सी.) या संदर्भातील प्रस्तावाच्या विश्‍लेषणावर काम करत आहे. ए.आर्.टी.आर्.ए.सी.ने तिबेटॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण देणार्‍या ७ संस्थांची माहिती मिळवली आहे. या ठिकाणी सैन्याधिकार्‍यांना शिक्षणासाठी पाठवले जाऊ शकते.