मॉरिशस येथे होणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण !

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मॉरिशस येथे लोकार्पण करण्यात येणार आहे. २८ एप्रिल या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद्रकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजात विजिगीषू वृत्ती निर्माण केल्यामुळेच ते ‘युगपुरुष’ ठरले !

छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि पराक्रम भारतीय युवकांवर बिंबवले पाहिजे, तरच युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल.

देशाला सश्रद्ध हिंदूंची आवश्यकता ! – श्री. शरद पोंक्षे, प्रखर हिंदुत्वनिष्ठ

जगात निधर्मी असे काही नसून धर्म आणि अधर्म असे दोनच भाग अस्तित्वात आहेत. रामायण, महाभारत घराघरांत वाचले गेले पाहिजे. देशाला सश्रद्ध हिंदूंची आवश्यकता आहे- हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद पोंक्षे

हिंदु एकता आंदोलनाच्‍या वतीने शिवजयंती उत्‍सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !

शिवप्रेमींनी आपल्‍या परिसरात शिवकालीन देखावे, भगव्‍या पताका, ध्‍वज लावण्‍याचे, तसेच २३ एप्रिल या दिवशी निघणार्‍या ऐतिहासिक दरबार मिरवणुकीत मोठ्या संख्‍येने उपस्‍थित रहाण्‍याचे आवाहन संघटनेच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

लंडनमधील वस्‍तूसंग्रहालयात छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख : भारतीय युवतीच्‍या आक्षेपानंतर प्रशासन करणार सुधारणा !

ब्रिटनमधील लंडन येथील ‘व्‍हिक्‍टोरिया अँड अल्‍बर्ट म्‍युझिअम’मध्‍ये प्रदर्शनासाठी ठेवलेल्‍या वाघनखांच्‍या बाजूला असलेल्‍या माहितीफलकावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख करण्‍यात आला आहे.

इतिहासाचा अमूल्य ठेवा !

छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवनच प्रेरणादायी आहे. त्यांनी अफझलखानाचा बाहेर काढलेला कोथळा, अनेक बलाढ्य मोगल राजांची उडवलेली धूळधाण, पाच पातशाह्यांचा केलेला नायनाट आदी सर्व हिंदूंमध्ये क्षात्रतेजाचे स्फुलिंग चेतवणारे आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ आणि ‘जगदंबा तलवार’ परत करण्याविषयी ब्रिटीश उपउच्चायुक्तांकडून सकारात्मक प्रतिसाद ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

ब्रिटिशांनी लुटून नेलेल्या या दोन्ही गोष्टींना ७५ वर्षांनंतर भारतात आणावे लागत असेल, हे तर केवळ मतांसाठी छत्रपती शिवरायांच्या नावाचा उदोउदो करणार्‍या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे !

महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा विकास करणार ! – छत्रपती उदयनराजे भोसले

१० एप्रिल या दिवशी संगम माहुली येथील महाराणी येसूबाई यांच्या समाधीचे दर्शन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतले. यानंतर ते प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते.

सावरकर यांनी कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला नाही !

सावरकर यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथातील ४ थे प्रकरण ‘सद्गुण विकृती’ हे आहे. या प्रकरणात सावरकर यांनी ‘हिंदूंच्या सद्गुण विकृतीमुळे काही समस्या निर्माण झाल्या’, असे म्हटले आहे.

कन्याकुमारी (तमिळनाडू) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून तोडफोड !

संतप्त नागरिकांकडून निदर्शने