आज २२ एप्रिल २०२३ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज जयंती (परंपरेनुसार) आहे. त्या निमित्ताने…
‘भारतात ‘वन्दे मातरम्’ आणि ‘जन-गण-मन’ यांना जसे राष्ट्रीय महत्त्व आहे, तसेच महत्त्व ‘युगपुरुष’ छत्रपती शिवाजी महाराज यांना दिले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि पराक्रम भारतीय युवकांवर बिंबवले पाहिजे, तरच युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. समाजात विजिगीषू वृत्ती निर्माण झाली, तरच देशाला विजयश्री खेचून आणता येते. छत्रपती शिवाजी महाराजांकडे अशी वृत्ती होती, म्हणून ते ‘युगपुरुष’ ठरले. छत्रपती शिवरायांनी आयुष्यभर कृष्णनीतीचा वापर केला. महाराज मुत्सद्दी, तसेच शूर योद्धा होते.’
– श्री. राहुल सोलापूरकर, प्रसिद्ध अभिनेते आणि हिंदुत्वनिष्ठ.