
सातारा, १२ एप्रिल (वार्ता.) – महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा सर्वार्थाने विकास केला जाईल. यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याच्या समवेत पुरातत्व विभाग आणि संबंधित अधिकारी यांसोबत लवकरच बैठक घेण्यात येईल, अशी माहिती भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली.

१० एप्रिल या दिवशी संगम माहुली येथील महाराणी येसूबाई यांच्या समाधीचे दर्शन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतले. यानंतर ते प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते. खासदार भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या युगपुरुषांचे योगदान अमूल्य आहे. आम्ही त्यांच्या घराण्यातील असलो, तरी महाराज कोणत्या एका घराण्यापुरते मर्यादित नव्हते. ते सर्वांचे होते. महाराणी येसूबाई यांच्या समाधीस्थळाचा विकास करणे, हे आमच्यासह शासनाचेही उत्तरदायित्व आहे. आपल्या पूर्वजांचा गौरवशाली इतिहास आपण विसरता कामा नये. यासाठी इतिहासाचे जतन व्हायला हवे.
गोव्यातील समुद्रकिनार्यांवरील अवैध गोष्टींवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित होईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
गोव्यातील अभियांत्रिकी उत्पादनांच्या निर्यातीत ३६ टक्क्यांनी वाढ ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
अखेर तुळजाभवानी देवीचा मुकुट सापडला; दोन जण जेरबंद
सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे भूमींच्या दरात वाढ !
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ७३५.२५ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण !
अनिरुद्ध कुंभार यांची ‘हिंदु एकता आंदोलन’च्या सांगली शहराध्यक्षपदी नियुक्ती !