बुरखा घालणे हे कट्टरतेचे लक्षण असल्याने श्रीलंका बुरख्यावर बंदी घालणार !

कुठे एक जिहादी आतंकवादी आक्रमण झाल्यावर अशा प्रकारचे धाडसी निर्णय घेणारी श्रीलंका, तर कुठे गेली ३ दशके सहस्रावधी जिहादी आतंकवादी आक्रमणे होऊन त्यात सहस्रो नागरिकांचा मृत्यू झाल्यावरही निष्क्रीय रहाणारा भारत !  

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह २० जणांवर खुनाचा गुन्हा नोंद

पडळ गावातील खटाव-माण साखर कारखान्यातील जगदीप थोरात यांना मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीमध्ये थोरात यांचा मृत्यू झाला.

चीनचे भारताशी सायबर युद्ध : एक आव्हान !

गलवानमध्ये चीनला भारताला हरवता आले नाही; म्हणून तो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्याशी लढण्याचा प्रयत्न करत आहे. अशा या सायबर युद्धात प्रत्येक नागरिकाचा सहभाग असणे आवश्यक आहे.

बेळगावात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या गाडीवर आक्रमण

पोलीस बंदोबस्तात जर रुग्णवाहिकेवर आक्रमण होत असेल, तर पोलीस प्रशासनासाठी ही नामुष्कीची गोष्ट आहे ! मराठी बांधवांवर सीमाभागात वारंवार होणारी आक्रमणे पहाता आता केंद्रानेच यात लक्ष घालण्याची वेळ आली आहे !

पुणे येथील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या २७ सर्व्हरवर सायबर आक्रमण, ५ कोटींची हानी

हॅकरकडून बिटकॉईनची मागणी पुणे, १० मार्च – येथील पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या २७ सर्व्हरवर सायबर आक्रमण झाल्याचे समोर आले असून अज्ञात परदेशी हॅकरने बिटकॉईनची (ऑनलाईन चलन) मागणी केली आहे. रॅन्समवेअरने आक्रमण केल्याचे उघड झाले आहे. (रॅन्समवेअरमध्ये कुणीतरी सायबर गुन्हेगार अज्ञात ठिकाणाहून तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हॅक करतो आणि तुमच्याकडे खंडणीची मागणी करतो. या प्रकारच्या सायबर … Read more

वर्गात रागवल्याने त्याचा सूड घेण्यासाठी विद्यार्थ्याचा शिक्षकावर गोळीबार

उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रतिदिन निघत असलेले धिंडवडे ! लहानपणीच साधनेचे संस्कार न केल्याचाच हा परिणाम आहे. याला आतापर्यंतचे शासनकर्तेच उत्तरदायी आहेत.

पुण्यातील गुंडांच्या टोळ्यांवर पोलिसांची कारवाई !

पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक निर्माण होण्याची आवश्यकता आहे.

नवी देहलीत झालेल्या इस्रायली दूतावासाजवळील बॉम्बस्फोटामागे इराणचा हात !

कालपर्यंत पाकसाठी देशद्रोही कारवाया करणारे आता इराणसाठीही देशद्रोही कारवाया करत आहेत ! पाकसमवेत आता इराणही भारतात सहजरित्या आतंकवादी कारवाया करू शकतो, हे भारताच्या गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षायंत्रणा यांना लज्जास्पद !

मोर्ले येथे हत्तीच्या आक्रमणात युवक गंभीर घायाळ

मोर्ले येथील शेतकरी विश्‍वनाथ सुतार काजूच्या बागेत गेले होते. तेव्हा अचानक आलेल्या हत्तीने सुतार यांच्यावर आक्रमण करत त्यांना उचलून आपटले. यामध्ये सुतार गंभीर घायाळ झाले.

हणजूण येथे नायजेरियन नागरिकाचा अमली पदार्थाच्या अतीसेवनाने मृत्यू

हणजूण येथे नायजेरियन नागरिक मायकल झुबे (वय ३३ वर्षे) याचा अमली पदार्थाच्या अतीसेवनाने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.