बांगलादेशात हिंदूंवर सशस्त्र आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याची संतप्त हिंदूंची पंतप्रधानांकडे मागणी  

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांविषयी सर्वपक्षीय नेते मूग गिळून गप्प का आहेत ? एरवी राजकारण करण्यासाठी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे, आंदोलने करणारे राजकारणी हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्‍न येतो, तेव्हा मौन का पाळतात ?

बांगलादेशमध्ये हिंदूंना दिली जाते खालच्या दर्जाचे नागरिक म्हणून वागणूक ! – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

बांगलादेशात हिंदुविरोधी भावना नवीन नाही. श्री दुर्गादेवीच्या पूजेच्या वेळी हिंदूंना कोणतेही संरक्षण दिले गेले नाही, हे विचित्र आहे. पंतप्रधान शेख हसीना हे चांगल्या प्रकारे जाणतात की, प्रतिवर्षी दुर्गापूजेच्या वेळी हिंदूंवर ‘जिहादी’ आक्रमणाची शक्यता असते

बांगलादेशमधील हिंदूंवरील आक्रमणाच्या विरोधात पणजी येथे इस्कॉनच्या वतीने निषेध मोर्चा

गोमंतकीय हिंदूंनो, हिंदूंवरील आक्रमणाविषयी लोकप्रतिनिधी गप्प आहेत. निवडणुकीसाठी ते मत मागायला येतील, तेव्हा ‘त्यांनी या प्रकरणी मौन का पत्करले ?’ ते विचारा !

हिंदूंची मंदिरे आणि हिंदू यांवर आक्रमणे करणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – नागेंद्रदास प्रभू, इस्कॉन

बांगलादेश येथे झालेल्या घटनेचा भारत सरकार, भारतातील हिंदू यांनी कठोर विरोध करावा आणि या विरोधात होणार्‍या आंदोलनांमध्ये सहभागी व्हावे. या प्रकरणी हिंदूंची मंदिरे आणि हिंदू यांवर आक्रमणे करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही भारत सरकारकडे करतो….

धाराशिव येथे दगडफेक करणार्‍या १५० धर्मांधांवर गुन्हे नोंद

शहरातील विजय चौकात प्रतिवर्षी नवरात्र महोत्सवानिमित्त भगवा झेंडा लावला जातो. त्यात ईद हा सण आल्याने मुसलमानांनीही या चौकात भगव्या झेंड्याच्या ठिकाणी हिरवा झेंडा लावला. यावरून वाद निर्माण होऊन १९ ऑक्टोबरच्या रात्री ४०० हून अधिक धर्मांधांनी परिसरातील हिंदूंच्या घरांवर दगडफेक करण्यासह वाहनांची तोडफोड केली.

बांगलादेशातील हिंदूंचा नरसंहार आणि सीमा सुरक्षा दलाचे अधिकार !

‘वर्ष १९५० च्या जनगणनेप्रमाणे पूर्वी बांगलादेशमध्ये (तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानमध्ये) २४ टक्के हिंदू होते. आज त्यांची संख्या ८ टक्क्यांहूनही अल्प झाली आहे. वर्ष १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धाच्या वेळी पाकिस्तानी सैन्याने ३० ते ४० लाख हिंदूंना ठार मारले.

वर्ष २०५० मध्ये बांगलादेशात हिंदूच नसतील ! – बांगलादेशी लेखकाच्या पुस्तकात दावा

भारतातील अल्पसंख्यांकांवर कथित अन्याय झाल्यावर आकाश-पाताळ एक करणार्‍या मानवाधिकार संघटना बांगलादेशमधील अल्पसंख्य हिंदूंंचे समूळ उच्चाटन होत असतांना चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाच्या विरोधात भाजपचे मुंबईत आंदोलन !

बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंवर धर्मांधांकडून होत असलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ २० ऑक्टोबर या दिवशी भाजपकडून कफ परेड मैदानावर हातात फलक धरून आंदोलन करण्यात आले.

बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात जागतिक स्तरावर सतत आवाज उठवणे आवश्यक ! – तथागत रॉय, माजी राज्यपाल, त्रिपुरा आणि मेघालय

बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षेसाठी हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात जागतिक स्तरावर सातत्याने आवाज उठवणे आवश्यक आहे. भारत सरकारनेही हिंदूंवरील आक्रमणे थांबवण्यासाठी बांगलादेशावर दबाव आणायला हवा, असे आवाहन त्रिपुरा आणि मेघालय राज्यांचे माजी राज्यपाल श्री. तथागत रॉय यांनी केले.

बांगलादेशमध्ये गेल्या ४० वर्षांत हिंदूंच्या लोकसंख्येत ५ टक्के घट !

गेल्या ४ दशकांत याकडे लक्ष न देणार्‍या भारतातील सर्वपक्षीय शासनकर्त्यांना हे लज्जास्पद ! आता तरी सरकार बांगलादेशातील हिंदूंसाठी काही करणार का ? असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात निर्माण होतो !