Shahjahan Sheikh Arrest : हिंदु महिलांचे लैंगिक शोषण करणारा तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याला अंततः अटक !

त्याला अटक झाली, तरी त्याच्यावर कारवाई होईल, असे हिंदूंना वाटत नाही. त्यामुळे केंद्र सरकारनेच त्याला अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकावरील आक्रमणाच्या प्रकरणी कह्यात घेऊन त्याचे खरे स्वरूप उघड करणे आवश्यक !

गोवा : म्हापसा येथील श्री बोडगेश्वर देवस्थानातील पादुकांची पेटी फोडणारे २ चोरटे गजाआड !

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! रात्री मंदिरांची राखण करायची सोडून झोपलेल्या सुरक्षारक्षकांवरच कारवाई व्हायला हवी !

पोरबंदर (गुजरात) किनार्‍यावरून ३ सहस्र ३०० किलो अमली पदार्थ जप्त !

समुद्री किनार्‍यावरून ३ सहस्र ३०० किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यांचे मूल्य २ सहस्र कोटी रुपयांहून अधिक असून त्यांची तस्करी करणार्‍या इराणी नौकेतील ५ विदेशी व्यापार्‍यांनाही अटक करण्यात आली आहे.

कुरकुंभ येथील अमली पदार्थ देहलीहून नंतर लंडनला पाठवले !

विमानाने ‘फूड डिलिव्हरी सर्व्हिस’च्या माध्यमातून अमली पदार्थ पाठवण्याची घटना उघडकीस आलेली आहे . या ड्रग्जची किंमत साधारण २८० कोटी रुपये असून या प्रकरणात आतापर्यंत एकूण ८ जणांना अटक करण्यात आली आहे.

पिंपरी (पुणे) येथे भारतीय चलनातील ७० सहस्र रुपयांच्या बनावट नोटा जप्त !

चीनमधून ऑनलाईन माध्यमाद्वारे कागद मागवून त्यावर भारतीय चलनातील बनावट नोटा छापण्यात आल्या असून पोलिसांनी यातील प्रमुख ६ जणांना अटक केली. त्यांच्याकडून ७० सहस्र रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

मुंबईत शस्त्रास्त्रे बाळगणार्‍याला अटक, गुन्हा नोंद !

हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन गुन्हे नोंद असलेल्या सराईत गुन्हेगाराला शस्त्रास्त्रांसह वरळी परिसरातून अटक करण्यात आली.

Bengal Ram Navami Violence Case : बंगालमध्ये गेल्या वर्षीच्या रामनवमी हिंसेच्या प्रकरणी १६ मुसलमानांना अटक !

दंगल होऊन १ वर्षाचा कालावधी झाला. त्यामुळे ‘दंगलखोरांना अटक करण्यासाठी एवढा अवधी का लागला?’, याचे उत्तर अन्वेषण यंत्रणांनी द्यायला हवे.

६ लाख रुपयांचे पारितोषिक असलेल्या महिला माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने केले जेरबंद !

‘टीसीओसी’ (नक्षलवाद्यांची सशस्त्र आक्रमक मोहीम) कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रीय सहभाग असलेल्या एका जहाल महिला माओवाद्याला अटक केली आहे.

Sandeshkhali Case : शेख शाहजहानला अटक करा ! – कोलकाता उच्च न्यायालयाचा सरकारला आदेश

उच्च न्यायालयाला असा आदेश द्यावा लागतो, यावरून बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती स्पष्ट होते ! बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावून तेथील परिस्थिती सुधारणे, हाच यावरील एकमेव उपाय आहे.

SIMI Terrorist Arrested : २२ वर्षे पसार असणारा सिमीचा आतंकवादी अटकेत !

तो सिमीच्या मासिकाचा संपादकही होता. हनीफ शेख वर्ष २००२ पासून पसार होता. तो भुसावळ येथे स्वतःची ओळख लपवून रहात होता. येथे एका उर्दू शाळेत शिक्षक झाला होता.